विविध पक्ष आणि संघटना
…या शहरात राष्ट्रवादीचा वर्धापन दिन संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २५ वा वर्धापन दिन आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते ध्वजारोहण मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आज २५ वं वर्ष पूर्ण केली आहेत.दि.१० जून १९९९ ला काँग्रेस पक्षातून बाहेर पडत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती.त्यानंतर प्रत्येक वर्धापन दिन पक्षाच्या वतीनं मुंबईसह राज्यभर मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा केला जातो.मात्र वर्तमानात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडाळीमुळे पक्ष विभागला गेला आहे.त्यामुळे यंदा दोन वर्धापन दिन साजरे केले जात आहेत.काँग्रेसमध्ये बंडखोरी करत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला.मात्र आता पुन्हा ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलिन करण्याची चर्चा सुरू झाली आहे.या पार्श्वभूमीवर हा स्थापना दिन कोपरगाव तालुक्यात अजित पवार गटाचे आ.आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला आहे.

सदर प्रसंगी मतदार कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कारभारी अगवन,कोपरगाव संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव,बाळासाहेब आढाव,अध्यक्ष सुनील गंगूले,उपाध्यक्ष अशोक आव्हाटे,युवा आघाडीचे अध्यक्ष नवाज कुरेशी,माजी नगरसेवक मंदार पहाडे,माजी नगरसेविका प्रतिभा शिलेदार,राजेंद्र वाघचौरे,डॉ.अनिरुद्ध काळे,राजेंद्र जोशी,पदाधिकारी,माजी नगरसेवक व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
कोपरगाव मतदार संघात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यातून आ.आशुतोष काळे यांनी विकासाची कामे केली आहे.मतदार संघातील रस्ते,वीज,पाणी,आरोग्य आदी विकासाचे बहुतांशी मूलभूत प्रश्न सुटले असल्याचा दावा मतदार संघातील केला आहे.मतदार संघातील इतरही विकासाचे प्रश्न यापुढील काळात सोडविणार असून मतदार संघाच्या विकासाची गती यापुढेही कायम राहणार आहे.त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांशी बांधील असणाऱ्या व जनतेचे हित साधणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा समाजातील तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचा व आ.काळे यांचे बाहू बळकट करण्याचा सर्व कार्यकर्त्यांनी यावेळी निर्धार व्यक्त केला आहे.