जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
दळणवळण

सावळीविहिर-कोपरगाव रस्त्याचे फुकटचे श्रेय लुटू नये-रोहोम

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव–सावळीविहीर रस्त्यासाठी निधी मिळण्यावरून कोपरगाव येथील पारंपरिक विरोधक श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे व विवेक कोल्हे यांच्यात वाद रंगला आहे.दोघांनीही आपणच या रस्त्यासाठी १८७ कोटींचा आधी आणला असल्याचा दावा केला आहे.तर याचे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखण्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम यांनी त्याचे खंडन केले आहे.

एन.एच. ७५२ जी राष्ट्रीय महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण करण्याचे जाहीर करून निधी देणार असल्याचा शब्द दिला होता.दिलेला शब्द पूर्ण करणारा नेता अशी खासियत असलेल्या ना.गडकरी यांनी आपला शब्द पूर्ण करून कोपरगाव-सावळीविहीर रस्त्यासाठी १७८ कोटी रुपयांचा निधी दिला आहे”-सुधाकर रोहोम,उपाध्यक्ष,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना.

राष्ट्रीय महामार्ग क्रं. ७५२ जी या राष्ट्रीय महामार्गाच्या कोपरगाव ते सावळीविहीर या रस्त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभाग नासिक यांचेकडून १७८ कोटीच्या खर्चाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.त्याबद्दल ना. आशुतोष काळे यांनी दिल्ली येथे जावून केंद्रीय मंत्री ना.गडकरी यांचे कोपरगाव विधानसभा मतदार संघातील नागरिकांच्या वतीने आभार मानले आहे.त्यावेळी मतदार संघातील रस्ते विकासाबाबत झालेल्या सविस्तर चर्चेदरम्यान ना.काळे यांनी त्यांना निवेदन देवून गोदावरी नदीवर सुरेगाव-सांगवी,मायगाव देवी-वेळापूर पुलासाठी तसेच एस.के.एफ.च्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांसाठी निधी मिळावा अशी मागणी केली आहे. मात्र कोल्हे कुटुंब विनाकारण वाद निर्माण करत असल्याचा आरोप सुधाकर रोहोम यांनी केला आहे.
त्याबाबत त्यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की,मतदार संघातील नागरिकांना ना.आशुतोष काळे हे स्वत: माहिती देणार होते.मात्र त्यांच्या आजीचे निधन झाल्यामुळे ते माहिती देवू शकले नाही.मात्र नेहमीच न केलेल्या कामाचे श्रेय घेण्यात तरबेज असणाऱ्या विरोधकांनी या संधीचा फायदा घेत प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.
सिन्नर,शिर्डी,अहमदनगर,दौंड,बारामती,पैठण ते कर्नाटक राज्यातील शिकोडी पर्यंत (राष्ट्रीय महामार्ग) एन.एच.१६० मंजूर करण्यात आला व राहाता तालुक्यातील सावळीविहीर फाटा ते सेंधवा (म.प्र.) पर्यंत या रस्त्यासाठी (राष्ट्रीय महामार्ग) एन.एच.७५२ जी असा क्रमांक देण्यात आलेला होता. मात्र हा राष्ट्रीय महामार्ग एन.एच.ए.आय.कडे हस्तांतरीत करण्यात आलेला नव्हता. हा राष्ट्रीय महामार्ग एन.एच.ए.आय.कडे हस्तांतरीत करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे ना.काळे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. तसेच हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करण्यासाठी राज्यशासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र देखील ना. आशुतोष काळे यांनी मिळवून दिल्यामुळे या रस्त्यासाठी निधी मिळण्याच्या अडचणी दूर झाल्या होत्या. ना.गडकरी अहमदनगर येथे एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी एन.एच. ७५२ जी राष्ट्रीय महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण करण्याचे जाहीर करून निधी देणार असल्याचा शब्द दिला होता.दिलेला शब्द पूर्ण करणारा नेता अशी खासियत असलेल्या ना.गडकरी यांनी आपला शब्द पूर्ण करून कोपरगाव-सावळीविहीर रस्त्यासाठी १७८ कोटी रुपयांचा निधी दिला आहे.या कामाची निविदा देखील प्रसिद्ध झाली असून या रस्त्याचा प्रश्न ना.काळे यांच्या अथक प्रयत्नांमुळेच सुटला आहे. ज्यावेळी ना.गडकरी अहमदनगर येथे आले व त्यांनी निधी देणार असल्याचे जाहीरपणे सांगितले होते त्यावेळी ना.काळे कोरोना बाधित असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते.त्यावेळी देखील विरोधकांनी नागरिकांमध्ये संभ्रम पसरवून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला होता. आता देखील दुसऱ्यांदा श्रेय घेण्याचा त्यांचा प्रयत्न केविलवाणा असल्याचे रोहोम यांनी म्हटले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close