दळणवळण
कोपरगाव तालुक्यातील रस्ते तातडीने पूर्ण करा-..या नेत्याचे आदेश
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यात विविध विकासकामे देण्यात आली आहे.मात्र अनेक ठेकेदारांकडून हि विकासकामे वेळेत पूर्ण होत नाही.त्यामुळे ज्या ठेकेदारांनी पंचायत समिती जिल्हा परिषद तसेच विविध योजनांच्या माध्यमातून विकासकामे घेतली आहेत.ती विकासकामे वेळेत गुणवत्तेची काळजी घेऊन लवकरात लवकर पूर्ण करावी अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी ठेकेदारांना दिल्या आहे.
नगर जिल्हा परिषद व कोपरगाव पंचायत समिती यांची निवडणूक काही दिवसावर येऊन ठेपली आहे.मात्र तालुक्यातील व शहरातील रस्त्यांची दैना काही जाण्याची चिन्हे दिसत नाही.त्या मुळे सत्ताधारी राजकीय तणावात आल्याचे दिसून येत असून शहर व तालुक्यातील रस्त्यांची दैना तत्काळ निकाली काढण्याच्या कामी लागल्याचे दिसून येत आहे मात्र पाच वर्ष निघून गेली असून त्याची अवस्था,”बैल गेला अन झोपा केला” अशी झाल्याचे दिसून येत आहे.
नगर जिल्हा परिषद व कोपरगाव पंचायत समिती यांची निवडणूक काही दिवसावर येऊन ठेपली आहे.मात्र तालुक्यातील व शहरातील रस्त्यांची दैना काही जाण्याची चिन्हे दिसत नाही.त्या मुळे सत्ताधारी राजकीय तणावात आल्याचे दिसून येत असून शहर व तालुक्यातील रस्त्यांची दैना तत्काळ निकाली काढण्याच्या कामी लागल्याचे दिसून येत आहे मात्र पाच वर्ष निघून गेली असून त्याची अवस्था,”बैल गेला अन झोपा केला” अशी झाल्याचे दिसून येत आहे.विशेष म्हणजे विरोधी पक्षांचा कधीही येथे विरोध जाणवला नाही हे विशेष ! तरीही ‘विकास’ मात्र गत पाच वर्ष रांगतच राहिला आहे हे आणखी दूसरे विशेष ! या पार्श्वभूमीवर नुकतीच कोपरगावचे आ.काळे यांनी पंचायत समितीच्या ठेकेदारांची बैठक घेऊन विकासकामाचा आढावा घेतला आहे,त्या वेळी हा आदेश दिला आहे.
सदर प्रसंगी कोपरगाव पंचायत समितीच्या सभापती पोर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,पंचायत समिती सदस्य मधुकर टेके,श्रावण आसने,कारभारी आगवन,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,रोहिदास होन,राहुल जगधने,दिलीप दाणे,प्रशांत वाबळे,सांडूभाई शेख,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,उपभियांता उत्तम पवार, सर्व शाखा अभियंता तसेच ठेकेदार उपस्थित होते.
त्या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”कोपरगाव तालुक्यात पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तसेच विविध योजनांच्या माध्यमातून अनेक विकासकामे संबंधित ठेकेदारांना दिले आहेत. ती कामे सबंधित ठेकेदारांनी गुणवत्तापूर्ण करून मुदतीच्या आत हि विकासकामे पूर्ण होतील याची काळजी सर्व ठेकेदारांनी घ्यावी अशा सूचना शेवटी आ.काळे यांनी दिल्या आहेत.