दळणवळण
कोपरगाव तालुक्यातील नादुरुस्त रस्त्यांसाठी दोन कोटींचा निधी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची अनेकवर्षात वाट लागली असून या रस्त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी राज्याच्या आघाडी सरकारने नुकताच दोन कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
कोपरगाव तालुक्यात मागील पाच वर्षात रस्त्यांची मोठी वाट लागली होती.समृद्धी महामार्ग,अवैध वाळूचोरी,अवैध गौण खनिज वाहतूक त्यामुळे रस्त्यांची मोठी चाळण झाली होती.त्या साठी मूवठ्या निधीची गरज होती.त्या साठी निवडून आल्यांवर आपण रस्त्यांची कामे करू असे आश्वासन आ.काळे यांनी दिले होते व त्यासाठी प्रयत्न केले असून आता निधी मिळण्यास प्रारंभ झाला आहे.
कोपरगाव तालुक्यात मागील पाच वर्षात रस्त्यांची मोठी वाट लागली होती.समृद्धी महामार्ग,अवैध वाळूचोरी,अवैध गौण खनिज वाहतूक त्यामुळे रस्त्यांची मोठी चाळण झाली होती.त्या साठी मूवठ्या निधीची गरज होती.त्या साठी निवडून आल्यांवर आपण रस्त्यांची कामे करू असे आश्वासन आ.काळे यांनी दिले होते व त्यासाठी प्रयत्न केले असून आता निधी मिळण्यास प्रारंभ झाला आहे. महाविकास आघाडी सरकारने पुन्हा एकदा कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्ते व पूल दुरुस्तीसाठी लेखाशीर्ष ३०५४/२४१९ अंतर्गत दोन कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. यामध्ये दहेगाव येथील विलास देशमुख घर ते गुलाबराव देशमुख घर -१६ लाख,वेस येथील मच्छिंद्र कोल्हे घर ते जालिंदर कोल्हे घर-२० लाख,जेऊर कुंभारी येथील रा.मा. १२ ते संजयनगर वस्ती-२० लाख,सुरेगाव येथील सुरेगाव गावठाण ते यशवंत निकम घर रस्ता-२६ लाख,धामोरी येथील धामोरी वेस रस्ता ते बाळासाहेब दरेकर शेती रस्ता -२० लाख,सोनारी येथील पुंजाबा सांगळे घर ते ज्ञानदेव पवार घर रस्ता -१० लाख, कोळपेवाडी येथील कोळपेवाडी गाव ते राज्य मार्ग ७ रस्ता -४० लाख, नाटेगाव येथील किरण कुदळे घर रस्ता ते राजेंद्र मोरे घर रस्ता -१६ लाख, वारी येथील महेश टेके घर रस्ता ते कोळनदी रस्ता -०८ लाख,कासली येथील राजेंद्र मलिक घर रस्ता ते बाबुराव मलिक घर रस्ता -१६ लाख,उक्कडगाव येथील कैलास निकम घर रस्ता ते देविदास निकम घर रस्ता – ८ लाख या रस्त्यांसाठी एकून दोन कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.