कोपरगाव तालुका
भावी पिढीसाठी वाचन चळवळ राबविणे गरजेचे-प्रा.डॉ.जोशी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
देशात व एकूणच जगात सर्वसामान्यांसाठी ज्ञानाची कवाडे विनामूल्य खुली करून वाचन संस्कृती रुजविण्याचे कार्य ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस.आर.रंगनाथन यांनी केले म्हणूनच संपूर्ण देशभरात डॉ.रंगनाथन यांची जन्मदिवस ‘ग्रंथालय दिन’ म्हणून साजरा केला जात असून हि चळवळ आगामी काळात राबविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्रा.डॉ.पी.जी.जोशी यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“महाविद्यालयात विविध विभागांच्या माध्यमातून विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले जाते. ग्रंथालय दिन व ज्येष्ठ नागरिकांची वार्षिक सभा हा असाच एक उपक्रम आहे.या निमित्ताने आम्ही ज्येष्ट नागरिकांसाठी एक व्हाट्सअँप ग्रुप सुरु करून त्यामाध्यमातून विविध विषयांचे उत्तम ग्रंथ डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे”-प्राचार्य बी.एस.यादव,के.जे.सोमय्या महाविद्यालय.
कोपरगाव येथील कोपरगाव एज्युकेशन सोसायटीच्या के.जे.सोमैया महाविद्यालयाच्या ग्रंथालय व माहिती शास्त्र विभागाच्या वतीने ‘ग्रंथालय-दिन’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्या वेळी प्रमुख अतिथी म्हणून त्यांनी मार्गदर्शन केले.त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस यादव हे होते.
सदर कार्यक्रमास प्रा.डॉ टी.आर.पाटील,डॉ.निर्मला कुलकर्णी,विलास नाईक,शरद घाटे, अशोकराव आढाव,बी.आर.शिंदे,सुभाष बनकर आदी ज्येष्ट नागरिक तसेच प्राध्यापक वृंद व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”सुसुंस्कृत आणि सभ्य समाजाच्या निर्मीतीसाठी औपचारिक शिक्षणाबरोबरच निरंतर वाचन आवश्यक असते,याचसाठी ग्रंथालय शास्त्राचा विकास झाला.”आजच्या डिजिटल युगामध्ये देखील वाचनसंस्कृती जोपासण्याचे काम ग्रंथालयांच्या माध्यमातून केले जात आहे.सोमय्या महाविद्यालयाचे ग्रंथालय एक भव्य आणि समृद्ध ग्रंथालय आहे.” येथे हजारो ग्रंथ आणि मासिकांबरोबरच अनेक ई-ग्रंथ व ई-जर्नल्स उपलब्ध आहेत.त्यांचा उपयोग विद्यार्थी व संशोधकांनी करून घ्यावा.वाचनाने माणसाचे आंतरिक व्यक्तिमत्व विकसित होते.देशाच्या इतिहासातील व एकूणच जागतिक कीर्तीचे अनेक वैज्ञानिक,महापुरुष,लेखक, समाज सुधारक हे आदी मुळेच घडले असल्याचेही ते म्हणाले.
महाविद्यालयाचे माजी कार्यालय अधीक्षक संभाजी नाईक म्हणाले की,”डॉ.एस.आर.रंगनाथन यांनी आपले संपूर्ण आयुष्य ग्रंथालय चळवळीसाठी वेचले.त्यांचे जीवन व कार्य थोर आहे.त्यांच्या जयंती निमित्त आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना महाविद्यालयात येण्याची संधी प्राप्त झाली याचा आम्हाला विशेष आनंद आहे.आम्हाला हवा असलेला एखादा महत्वाचा ग्रंथ घरपोच मिळाला तर आमचा आनंद आणखी वाढेल.सदर प्रसंगी ग्रंथपाल नीता शिंदे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हाट्सअँप ग्रुप सुरु केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.”
एका आजच्या डिजिटल युगात विद्यार्थी जगतात ग्रंथापेक्षा मोबाईल व संगणकाचे प्रस्थ वाढले आहे.तरीही या माध्यमातूनही विद्यार्थी आपल्या वाचनाची भूक शमवू शकतात,कारण आज मोबाईलवर सर्व वर्तमानपत्रे,मासिके,पाक्षिकांसोबतच अनेक मौल्यवान ग्रंथसंपदाही उपलब्ध असल्याचे ही प्रा.शिंदे शेवटी म्हणाल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ग्रंथपाल प्रा.निता शिंदे केले तर उपस्थितांचे स्वागत बाळासाहेब पानगव्हाणे यांनी केले तर उपस्थितांचे आभार रवींद्र रोहमारे यांनी मानले आहे.तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथालय विभागाचे स्वप्निल आंबरे,अविनाश शिंदे यांनी परिश्रम घेतले.