जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
दळणवळण

… या साई पालखी मार्गावर होणार नवीन बस सुरू !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   राज्य सरकारने परिवहन मंडळाच्या बसची दुरावस्था पाहून अडीच हजार बस खरेदी केली असून त्या बस कोपरगाव बस आगारास मिळाल्यावर साईभक्तांसाठी सर्वात जवळचा ठरणारा व पालखी मार्ग गणल्या जाणाऱ्या जवळके मार्गे शिर्डी-सिन्नर बस सुरू करणार असल्याची माहिती राज्य परिवहन मंडळाचे कोपरगाव आगाराचे आगार व्यवस्थापक अमोल बनकर यांनी सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब जवरे यांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना दिली आहे.

 

आठ वर्षापूर्वी केंद्रिय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी यांचेकडून खा.वाकचौरे यांचे माध्यमातून जवळके स्थित जनमंगल ग्रामविकास संस्थेने दिल्लीत पाठपुरावा करून १० कोटी रुपयांचा निधी आणून सदर रस्ता दुपदरी करण्यात आला होता मात्र तरीही बस सुरू झाली नव्हती हे विशेष !

    कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या महावितरण,राज्य परिवहन महामंडळ व पोलीस प्रशासन आदी विभागा संदर्भात नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी नुकताच तहसील कार्यालय,कोपरगाव येथे आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब जवरे यांनी जवळके मार्गे शिर्डी सिन्नर मार्ग आता पक्का झाला असताना व शिर्डी येथे येणाऱ्या साई भक्तांना सर्वात जवळचा ठरत असतानाही त्याची मागणी जवळके येथील सरपंच सारिका विजय थोरात यांनी शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे,आ.आशुतोष काळे यांचेसह राज्य परिवहन मंडळाचे अधिकारी यांचेकडे अनेक महिन्यांपासून केली असताना या मार्गावर अद्याप बस का सुरू होत नाही.रस्ता कच्चा व पावसाळ्यात न वापरता येणारा होता.आठ वर्षापूर्वी केंद्रिय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी यांचेकडून खा.वाकचौरे यांचे माध्यमातून जवळके स्थित जनमंगल ग्रामविकास संस्थेने दिल्लीत पाठपुरावा करून दहा कोटी रुपयांचा निधी आणून सदर रस्ता दुपदरी करण्यात आला होता.त्यावेळी राज्य परिवहन मंडळाचे कोपरगाव आगाराचे आगार व्यवस्थापक अमोल बनकर यांनी हे आश्वासन दिले आहे.

   त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”परिवहन आयुक्त कार्यालयात एस.टी.महामंडळ कामकाज आढावा बैठक परिवहन मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक नुकतीच संपन्न झाली आहे त्यात  बस खरेदी चा विषय घेण्यात आला आहे.बैठकीस एस.टी.महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.त्यावेळी मंत्री महोदयांनी आगामी काळात नवीन बस खरेदीचा करताना पुढील पाच वर्षात प्रवासी सेवेतून बाद होणाऱ्या होणाऱ्या बसेसचा विचार करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.याबाबत सर्वांगीण अभ्यास करून पंचवार्षिक योजना आणनार असल्याचे सांगितले आहे.एस.टी.महामंडळात इलेक्ट्रिक बसेस घेण्यात येत आहे.यासाठी प्रत्येक आगारामध्ये चार्जिंग स्टेशन प्राधान्याने उभारण्यात येणार आहे.महामंडळाने उत्पन्न वाढीसाठी पूरक योजना आणन्यात येत आहे.त्यातून नवीन बस आल्यावर साई भक्तांना महत्वाचा ठरणारा जवळके मार्गे शिर्डी-सिन्नर ही बस सुरू करणार आहे.त्या मार्गावर जवळपास तीस पस्तीस गावे सलग्न असून त्यांच्या प्रवासाचा मार्ग मोकळा होणार आहे.शिवाय तळेगाव दिघे मार्गे जाणाऱ्या बस कमी झाल्या असून त्यामुळे महाविद्यालयातील व शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना कमी बस उपलब्ध होत आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षिणक नुकसान होत आहे.परिणामी विद्यार्थी आणि पालक यांची ओरड होत आहे.त्यावरही नवीन बस मुळे मात करणे शक्य होणार आहे.
  
   त्यामुळे या आश्वासनानंतर मार्गदर्शक नानासाहेब जवरे,एस.के.थोरात,माजी सरपंच वसंत थोरात,माजी उपसरपंच डी.के.थोरात,विश्वनाथ थोरात,विजय थोरात,गोरक्षनाथ थोरात,गोरक्षनाथ थोरात,नवनाथ थोरात,गोरक्षनाथ शिंदे,उत्तमराव थोरात,अशोक शिंदे,सरपंच सारिका विजय थोरात,सदस्य भाऊसाहेब थोरात,मीना विठ्ठल थोरात,वनिता रखमा वाकचौरे,इंदुबाई नवनाथ शिंदे,चंद्रकांत थोरात,गोरक्षनाथ वाकचौरे,विजय शिंदे,अरुण थोरात,गणेश थोरात,दत्तू नामदेव थोरात,विश्वनाथ शिंदे,बी.टी.थोरात,संजय थोरात,गोरक्षनाथ जयराम थोरात,सरपंच राजेंद्र नेहे,वाल्मीक नेहे,नानासाहेब नेहे,माजी सरपंच ज्ञानेश्वर नेहे,बाबासाहेब नेहे,बाळासाहेब काकडे,शेखर वाणी आदींनी समाधान व्यक्त केलेआहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close