व्यापार विषयक
परमिट धारक रिक्षा चालकांना मानधन दया- मागणी
संपादक-नानासाहेब जवरे
वाकडी-(किरण शिंदे)
देशभरात सर्वत्र कोरोना आजाराने थैमान घातले असताना कोरोना आजारवर कुठलीही लस किंवा गोळ्या औषधांचा अद्याप शोध न लागल्याने अजूनही बहुतेक शहरातील टाळेबंदी जैसे थे स्थितित असल्याने श्रीरामपुर शहरातील परमिट धारक रिक्षा चालकांमधे बेरोजगारीचे संकट निर्माण झाले आहे.या साथीमुळे बेरोजगार झालेल्या रिक्षाचालकांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आर.पी.आय.गटाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ कापसे यांनी श्रीरामपूर येथील प्रांताधिकारी यांचेकडे एका निवेदनाद्वारे नुकतीच केली आहे.
कोरोना साथीने देशासह जगभर कहर उडवून दिला आहे.त्यामुळे अनेक उद्योग धंदे,व्यवसाय बंद करण्याची नामुष्की बहुतांशी व्यावसायिकांवर आली आहे.मर्यादित प्रवासी वाहतुकीमुळे धड जगता येईना आणि धड मरता येईना अशी अवस्था या व्यवसायिंकावर आली आहे. या तोकड्या परवान्यामुळे प्रवाशी वाहतूक परवडत नसल्याने काहिनी सध्या व्यवसाय बंद ठेवला आहे अशा रिक्षा चालकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार असल्याने कोरोना आजार नियंत्रित होईपर्यंत परमिट धारक रिक्षा चालकांना दहा हजार रुपये मानधन देण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया(आठवले)चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ कापसे यांनी श्रीरामपुर प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे
काही रिक्षा चालकांकड़े रिक्षाचे कर्ज हप्ते भरण्यासाठी देखील पैसे नाही त्यामुळे दिल्लीच्या धर्तिवर रिक्षा चालकांना मानधन देण्यात यावे अशी मागणी कापसे यांनी केली आहे.
या निवेदनावर संजय बोरगे,अरुण खंडीझोड़,उमेश जावळे,चंदू गाड़ेकर,अशोक सोनवने,शद्धारभाई पठान,राजू सुपले,इक़बाल शेख,प्रकाश वराडे,प्रताप आबनावे,राजू सुतार,रईस फिटर,इब्राहिम शेख,संजय खंडागळे,सेवक जगताप आदि रिक्षा चालकांच्या सह्या आहेत