जाहिरात-9423439946
आरोग्य

वाकड़ी येथील त्या तिघांचे अहवाल आले

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

वाकडी-(प्रतिनिधी)

राहाता तालुक्यातील वाकड़ी ग्रामपंचायत हद्दीतील संशयित तिघांचा अहवाल निरंक आल्याने वाकड़ी येथील ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.कोरोना साथीचा प्रतिबंध करण्यासाठी आता सर्वांनीच गंभीर दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.त्या संबंधी ग्रामपंचायतीने आवाहन केले आहे.

वाकड़ी येथील कोरोना बाधित संशयितांना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सुचनेने कर्मचारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र वाकड़ी यांच्या रुग्णवाहीकेतुन शिर्डी येथील विलगीकरण केंद्रात पाठविले होते. तेथे त्यांच्या घशातील श्रावांचे नमूने तपासणीसाठी पाठविले होते. या तिघांचा अहवाल गुरुवार ९ जुलै रोजी निरंक आल्याने या तिघांना वाकड़ी येथील घरीच विलगीकरण करण्यात आल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ बच्छाव एस.एस. यांनी दिली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,वाकड़ी येथील एका महिलेचे प्रसूति दरम्यान सिझर झाल्याने नाशिक येथे शासकीय रुग्णालयात उपचारा दरम्यान आठ दिवसापूर्वी मृत्यु झाला होता.सदर महिलेचा मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात न देता तेथिल आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परस्पर अंत्यविधी केला असल्याची माहिती कुटुंबीयांना दिली होती.मृत महिलेच्या संपर्कातील तिघांना आर.पी.आय.चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ कापसे,पोलिस पाटिल मछिंद्र अभंग, ग्रामविकास अधिकारी रमेश सोमवंशी,पत्रकार किरण शिंदे यांनी गावातील प्राथमिक आरोग्य विभाग येथे उपचारार्थ दाखल केले होते.वाकड़ी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सुचनेने कर्मचारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र वाकड़ी यांच्या रुग्णवाहीकेतुन शिर्डी येथील विलगीकरण केंद्रात पाठविले होते. तेथे त्यांच्या घशातील श्रावांचे नमूने तपासणीसाठी पाठविले होते. या तिघांचा अहवाल गुरुवार ९ जुलै रोजी निरंक आल्याने या तिघांना वाकड़ी येथील घरीच विलगीकरण करण्यात आल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ बच्छाव एस.एस. यांनी दिली आहे.

वाकड़ी गावात आता ग्रामपंचायतीने दर सोमवारी जनता संचारबंदी लागू केली आहे.त्यासाठी दुकान वेळ सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंत करण्यात आली आहे.बाहेरील व्यक्तिस भाजीपाला विक्री करण्यास गावात बंदी घातली आहे.तसेच प्रत्येक दुकानदारने तीन पेक्षा जास्त ग्राहक गर्दी होऊ न देता प्रत्येक ग्राहकास विषाणू प्रतिबंधक औषधांचा वापर करण्याचे बंधन घातले आहे.दुकानदार व ग्राहक हे विणा मुखपट्टी आढळल्यास सुरुवातीस एक हजार रुपये दंड व नंतर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे कोरोना समिति व ग्रामपंचायत कडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.त्याच प्रमाणे ठरविलेल्या वेळ व अनावश्यक गर्दी आढळल्यास दुकान सील करुण फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचे ग्रामपंचायतच्या प्रसिद्धी पत्रकात शेवटी म्हटले आहे.त्यामुळे निष्काळजी ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close