जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावातील रस्ते निधीसाठी आधी नकाशावर घ्या-मागणी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरेकोपरगाव-(प्रतिनिधी)मतदार संघाचा रस्ते विकासाचा प्रश्न मोठा गंभीर आहे.अनेक रस्ते नकाशावरच नाहीत.हे रस्ते नकाशावर आल्याशिवाय निधी उपलब्ध होणार नाही. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना हे रस्ते नकाशावर घेण्यासाठी आदेश कोपरगावचे आ.अशुतोष काळे यांनी दिले आहेत.त्यामुळे तालुक्यातील ग्रामस्थांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे राज्य मार्ग ३६ ते कारवाडी या हद्द रस्त्याचे लोकार्पण आ.आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते पार पडले या प्रसंगी ते बोलत होते.
या वेळी जिल्हा परिषद सदस्या सोनाली साबळे,संचालक सुधाकर रोहोम,उपसभापती अर्जुन काळे,सदस्य मधुकर टेके,जिनिंगचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर,गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे,उपअभियंता उत्तम पवार,सुदाम लोंढे,विजय रक्ताटे,विजय थोरात,महेश लोंढे,दीपक रोहोम,जालिंदर हाडोळे,आबा रक्ताटे,कॉन्ट्रॅक्टर वैभव घुले,ग्रामसेवक डी. बी. गायकवाड, शिंदे आदी उपस्थित होते.

या वेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,”जिल्हा परिषद पंचायत समिती सत्ता बदल झाल्यापासून सर्व सदस्यांनी चिकाटीने काम केल्याने निधीत भरघोस वाढ झाली आहे.त्यामुळे वैयक्तीक लाभाच्या योजना,शाळा,खोल्या,दलित वस्ती सुधारणा,ग्रामपंचायत कार्यालय,रस्ते आदी विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळत आहे.पाट पाण्याचा संघर्ष सुरुच आहे.सुरु असलेल्या समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून ओढे,नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करून पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे आ.काळे यांनी शेवटी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close