जाहिरात-9423439946
पर्यटन व तीर्थक्षेत्र

केदारनाथचे यात्रेकरूमाने यांचा सत्कार संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

सांगली येथून केदारनाथ यात्रेला पायी निघालेल्या शिवभक्त अमर संभाजी माने यांनी सोमेश्वर महादेव पुजा करुन दर्शन घेतले.या प्रसंगी कोपरगाव येथील सोमेश्वर महादेव देवस्थानचे वतीने मानाचे टोपी उपरणे देवून स्वागत केले आहे.

या प्रसंगी सोमेश्वर महादेव देवस्थानचे प्रमुख महेंद्रजी पाटील यांचे मार्गदर्शनाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत घोडके,व्यवस्थापन समितीचे सदस्य महावीर शिंगी,मनोज कपोते,जयंत विसपुते,माजी नगरसेवक मेहमूद सय्यद,महाशक्ती अॅम्ब्युलन्स सेवेचे अध्यक्ष शब्बीर शहा,अमित खोकले,सोहेल शहा,मनोज विसपुते,सतिष चोरडिया (मलकापूर),राहुल देवळालीकर,अनिल भावसार आदी मान्यवर उपस्थित होते.

आठ दिवसांपासून शिवभक्त अमरजी संभाजी माने हे सांगली येथून मार्गस्थ झाले आहे.ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कोपरगाव पुण्यभूमीत सोमेश्वर महादेव देवस्थान या पवित्र स्थानावर कोपरगावकरांनी यांनी केलेल्या स्वागताने समाधान मिळाल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close