कोपरगाव तालुका
कोपरगाव पाच क्रं.५ तलावाच्या कामाची प्रशासकीय मान्यता अल्पावधीतच-आश्वासन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव साठवण तलावाचे पाणी लवकरात लवकर देण्यासाठी आपण लवकरच प्रशासकीय मान्यता घेऊन हा प्रश्न मार्गी लावू व ही समस्या दूर करू असे प्रतिपादन कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष आशितोष काळे यांनी केले आहे.
“आपली शिर्डी येथील साई संस्थानच्या अध्यक्षपदी निवड झाली पण अधिभार घेण्यासाठी अडचणी येत होत्या व आपण नुसते नावाचे अध्यक्ष होतो मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने आपल्याला कार्यभार मिळाला आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव विधानसभा मतदार संघ.
“कोपरगाव न्यायालयाची इमारत ३८.६३ कोटी रुपयांची असून ती चार मजली राहणार असून यात तळ मजला हा गाड्या पार्किंगसाठी तर पहिला व दुसरा,तिसरा मजला हा न्यायालयीन कामकाजासाठी राहणार आहे तर चौथा मजला हा वाचनालय व वकीलांसाठी बार रूम राहणार आहे.याचे एकूण क्षेत्रफळ हे तब्बल ९० हजार चौरस फूट राहणार आहे.व एकूण लांब-रुंदी हि ४३/४३ मीटर राहणार आहे”-प्रशांत वाकचौरे,सहाय्यक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग.
कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या बांधण्यात आलेल्या ब्रिटीशकालीन इमारतींची दुरावस्था झालेल्या दिवाणी न्यायालय इमारतीसाठी विधी व न्याय विभागाकडून ३८ कोटी ६३ लाख ४९ हजार रुपये निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याबद्दल आ.आशुतोष काळे यांचा सत्कार कोपरगाव वकील संघाने आयोजित केला होता त्याबद्दल सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. सदर प्रसंगी कोपरगाव वकील संघाचे अध्यक्ष विद्यासागर शिंदे,अड.गणेश मोकळं,खजिनदार गणेश भोकरे,माजी अध्यक्ष अड.शिरीशकुमार लोहकणे,अड.जपे,अड.अशोक देशमुख,अड.एम.पी.येवले,बांधकाम विभागाचे सहायक अभियंता प्रशांत वाकचौरे,पाटील,अड.बाळासाहेब कडू,अड.शंतनू धोर्डे,संजय भोकरे,विरेन बोरावके,रमेश गवळी,अड.योगेश खालकर,अड.शंकरराव यादव,अड.गौरव गुरसळ,अड.अतिष आगवन,अड.महेश भिडे,महेश सोनवणे,अड.वैभव बागुल आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की,”आपण निवडणूक पूर्व वकिलाच्या प्रदर्शन हॉल येथे संपन्न झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना,” तुम्ही मला निवडून दिल्यावर आपण तुमचे प्रश्न मार्गी लावू “असे आश्वासन दिले होते.त्या बाबत तुम्ही तुमची भूमिका चोख पार पाड्ल्याने आपली जबाबदारी सुरु झाली होती.न्यायालयीन इमारतीला निधी मिळवून ती पहिल्या टप्यात आपण पूर्ण केल्याचा दावा करून त्यांनी,”आपली शिर्डी येथील साई संस्थानच्या अध्यक्षपदी निवड झाली पण अधिभार घेण्यासाठी अडचणी येत होत्या व आपण नुसते नावाचे अध्यक्ष होतो मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने आपल्याला कार्यभार मिळाला आहे”. मात्र वकील संघाचे नूतन अध्यक्ष विद्यासागर शिंदे यांनी कायदेशीर मदत केल्याने आपल्याला कार्यभार घेण्याची संधी मिळाल्याचे ऋण निर्देश व्यक्त केले.व “आगामी काळात आपले सर्व कामे मार्गी लावण्यासाठी आपण कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत आपल्या उमेदवारांना आपण बहुमताने निवडून द्यावे” असे आवाहन करायला ते विसरले नाही.
सदर प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता प्रशांत वाकचौरे यांनी,”सदर कामाची ३८.६३ कोटी रुपयांची हि निविदा निघण्यास किमान तीन महिन्याचा कालावधी लागणार आहे.त्या नंतर कामास सुरुवात होणार असून यात हि न्यायालयाची इमारत चार माजली राहणार असून यात तळ मजला हा गाड्या पार्किंगसाठी तर पहिला व दुसरा,तिसरा मजला हा न्यायालयीन कामकाजासाठी राहणार आहे तर चौथा मजला हा वाचनालय व वकीलांसाठी बार रूम राहणार आहे.याचे एकूण क्षेत्रफळ हे तब्बल ९० हजार चौरस फूट राहणार आहे.व एकूण लांब-रुंदी हि ४३/४३ मीटर राहणार आहे.असल्याची माहिती दिली आहे.
सदर प्रसंगी अड्.कडू यांनी बोलताना म्हटले आहे की,”कोपरगाव न्यायालयात कनिष्ठ वकिलांची मोठी संख्या असून त्यांना जागा कमी पडत आहे त्यांच्या चेंबरसाठी समोरची पोलीस ठाण्याची पश्चिम बाजूची जागा गरजेची असून तेथील वाहनांचे भंगार बाजूला काढून त्या ठिकाणची जागा सरकारमार्फत ताब्यात घेऊन बगीचा,व न्यायालयीन अधिकारी कर्मचारी यांना निवास व्यवस्था आदींसाची सोय करता येईल अशी मागणी केली आहे.
दरम्यान आ.काळे यांनी कोपरगाव शहरासाठी जी नवीन पाच क्रं.तलावासाठी जी २०.१२ कोटी रुपयांची तांत्रिक मान्यता मिळवली आहे ती अत्यंत योग्य असून तो कोपरगावच्या पाणी समस्येसाठी मुख्य इलाज आहे.त्यासाठी त्यांचे कोपरगाव वकील संघ त्याचें आभार मानत असल्याचे अड.बाळासाहेब कडू यांनी म्हटले आहे.
सदर प्रसंगी आ.काळे यांनी कोपरगाव न्यायालयाच्या इमारतीसाठी ३८.६३ कोटी रुपये मंजूर केल्या बद्दल त्यांचा वकील संघाने शाल,फेटा,श्रीफळ,हार,देऊन सत्कार करण्यात आला.
सदर प्रसंगीं प्रास्तविक विद्यासागर शिंदे,तर उपस्थितांना मार्गदर्शन अड.शंतनू धोर्डे,बाळासाहेब कडू,अड.नितीन पोळ,आदींनी आपले मनोगत व्यक्त करून विविध सूचना मांडल्या.तर उपस्थितांचे आभार वकील संघाचे खजिनदार गणेश भोकरे यांनी मानले आहे.