जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पर्यटन व तीर्थक्षेत्र

साईंचे दोन उत्सव आभासी पद्धतीने होणार साजरे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्था तसेच शिर्डी नाट्य रसिक मंच,आणि शिर्डी ग्रामस्‍थ यांच्‍या सहकार्याने दरवर्षी श्रावण शुध्‍द प्रतिपदेपासून सुरू होणारा श्री साईसच्‍चरित पारायण सोहळा यावर्षीपासून गोकुळाष्‍टमीच्‍या अगोदर श्रावण वद्य १ पासून म्‍हणजेच दिनांक ०४ ऑगस्‍ट २०२० पासून आयोजित करण्‍यास समितीने मान्‍यता दिली आहे. तथापि कोरोना व्‍हायरसच्‍या पार्श्‍वभूमीवर हे दोन्‍ही उत्‍सव आभासी पध्‍दतीने साजरे करण्‍यात येणार असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

गोकुळाष्‍टमी उत्‍सवाची रुढी पुर्वापार आहे व पारायण सोहळाही गेल्‍या २५ वर्षापासून सुरू आहे.सध्‍या संपूर्ण भारतात कोव्‍हीड-१९ (कोरोना व्‍हायरस) या साथीच्‍या रोगाचा प्रादुर्भाव असल्‍याने श्री साईबाबांचे मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी अनिश्चित काळासाठी बंद करण्‍यात आले आहे. ते दर्शनासाठी परत कधी सुरू होईल याची शाश्‍वती नाही. कोरोना व्‍हायरसच्‍या संसर्गामुळे गर्दी करण्‍यावर, गर्दीचे कार्यक्रम करण्‍यावर शासनामार्फत निर्बंध घालण्‍यात आलेले आहेत.

श्री डोंगरे म्‍हणाले,शिर्डी ग्रामस्‍थांच्‍या वतीने वारंवार गोकुळाष्‍टमी उत्‍सव साजरा करावा अशी मागणी होत होती.गोकुळाष्‍टमी उत्‍सव हा पूर्वी शिर्डी येथे स्‍थानिक स्‍वरूपातच परंतु व्‍यापक प्रमाणात साजरा होत असल्‍याबाबतचा उल्‍लेख संस्‍थान प्रकाशित सन-१९२३ सालच्‍या श्री साईलीला या नियतकालिकात आला आहे.पूर्वापांर होत असलेला गोकुळाष्‍टमी उत्‍सव आणि गेल्‍या पंचवीस वर्षापासून होत असलेला श्री साईसच्‍चरित पारायण सोहळा हे योगायोगाने श्रावण या एकाच महिण्‍यात येतात.त्‍यामुळे पारायणाच्‍या आरंभाची तिथी पुढें सरकवल्‍यास पूर्वी व्‍यापक स्‍वरूपात स्‍थानिक पातळीवर होणारा गोकुळाष्‍टमी उत्‍सव आताही व्‍यापक स्‍वरूपात साजरा करण्‍यात येणार आहे.गोकुळाष्‍टमी उत्‍सवाची रुढी पुर्वापार आहे व पारायण सोहळाही गेल्‍या २५ वर्षापासून सुरू आहे.
सध्‍या संपूर्ण भारतात कोव्‍हीड-१९ (कोरोना व्‍हायरस) या साथीच्‍या रोगाचा प्रादुर्भाव असल्‍याने श्री साईबाबांचे मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी अनिश्चित काळासाठी बंद करण्‍यात आले आहे. ते दर्शनासाठी परत कधी सुरू होईल याची शाश्‍वती नाही. कोरोना व्‍हायरसच्‍या संसर्गामुळे गर्दी करण्‍यावर, गर्दीचे कार्यक्रम करण्‍यावर शासनामार्फत निर्बंध घालण्‍यात आलेले आहेत. तसेच राज्‍यात साथरोग प्रतिबंधात्‍मक कायद्यान्‍वये अधिसुचना निर्गमीत करण्‍यात आलेली आहे. सदरच्‍या अधिसूचनेचा कालावधी महाराष्‍ट्रात व अहमदनगर जिल्‍ह्यात ३१ जुलै पर्यंत आहे त्‍यामुळे चालु वर्षी सामुदायीकरित्‍या पारायण सोहळा आयोजित करता येणार नाही.कोरोना व्‍हायरसच्‍या पार्श्‍वभूमीवर हे दोन्‍ही उत्‍सव आभासी पध्‍दतीने साजरा करण्‍यात येणार आहे.आता केवळ पारायण सोहळयाचा आरंभ दिन पुढे सरकवून तो दिनांक ०४ ऑगस्‍ट रोजी पासून सकाळी ७.०० ते ११.०० या वेळेत होणार आहे.

श्री साईसच्‍चरित सामुदायिक पारायण सोहळयासह गोकुळाष्‍टमी असे या उत्‍सवाचे स्‍वरूप असेल त्‍यामुळे या पारायण सोहळयाची गेल्‍या २५ वर्षाची दीर्घ परंपरा विचारात घेता या परंपरेला छेद जाऊ नये म्‍हणून सामुदायिक स्‍वरूपात पारायण आयोजित न करता तो यावर्षीपासून श्रावण वद्य एक या तिथीला सुरू करुन श्री साईबाबा समाधी मंदिरासमारील स्‍टेजवर संस्‍थान पुजा-यांची पारायण वाचनाची बैठक व्‍यवस्‍था करण्‍यात येणार असून पारायण वाचनाचे थेट प्रक्षेपण करण्‍यात येणार असल्‍याचे सांगुन सर्व साईभक्‍तांनी आपल्‍या घरीच यावेळेत पारायण वाचन करावे असे आवाहन ही श्री डोंगरे यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close