जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगाव शहर व तालुक्यात कोरोनावाढ थांबेना !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात काल गोदामगल्ली मार्गावर एक डॉक्टर व रवंदे येथे एक बँड पथकातील सदस्य बाधित निघाले असताना आज त्या डॉक्टरची पत्नी व रवंदे येथील त्या इसमाचा मुलगा व कोपरगाव येथील पॉवर हाऊस जवळ दवाखाना असलेले एक डॉक्टर असे तिघेजण कोरोना बाधित निघाले असल्याची माहिती डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे आज पुन्हा तालुक्यात खळबळ उडाली आहे.

कोपरगाव तालुक्यात सुरेगावात उच्चांक झालेला आहे.मात्र त्यातील पाचहून अधिक रुग्ण आज नियंत्रणात आले आहे.हि समाधानाची बाब आहे.मात्र आज या तीन रुग्णांनी पुन्हा एकदा कहर उडवून दिला आहे.अशा परिस्थिती नागरिकांनी स्वतःहून काळजी घेणे अपेक्षित आहे.मात्र त्या पातळीवर नागरिकांत शुकशुकाट दिसत असल्याने काळजी वाढली आहे.

कोरोना विषाणूने जगभर कहर उडवून दिला आहे.देशभरात आज ०१ हजार ५९१ रुग्णांची वाढ होऊन बाधित रुग्णांचा आकडा ११ लाख ९५ हजार ६७४ वर गेला आहे व कोरोना बाधित नागरिकांच्या मृत्यूची संख्या २८ हजार ७८१ वर जाऊन पोहचली आहे तर राज्यात बाधित रुग्णांचा आकडा ३ लाख २७ हजार ०३१ वर जाऊन पोहचला आहे तर राज्यात कोरोना बाधितांचा मृत्यू १२ हजार २७६ वर जाऊन पोहचला आहे.नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा ०१ हजार ९१८ वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ३८ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यात दोन बळी गेले आहे.

कोपरगाव शहरासह तालुक्यातील 3 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने चिंतेचे वातावरण निर्माण…!
यामध्ये स्वामी विवेकानंद नगर मधील 62 वर्षीय डॉक्टर ची 58 वर्षीय पत्नी, तसेच शहरातील मध्यवर्ती परिसरातील 58 वर्षीय डॉक्टर व तालुक्यातील रवंदा येथील 30 वर्षीय युवक असे तीन जणांचे कोरनो अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे .
तपासणी केलेल्या ३१ अहवाला पैकी २० अहवाल आज प्राप्त झाले आहे.. त्यात तीन कोरोना बाधित तर १७ अहवाल निरांक आले असून ११ अहवाल अद्याप प्रलंबित असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव तालुक्यात अलीकडील काही दिवसात बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.यात जेष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीयरित्या असली तरी चाळीशीच्या वर असलेल्या नागरिकांनाही या साथीत बळी पडावे लागत आहे.विशेषतः कोपरगाव शहरात कोरोनाची संकट हे उपचार करणाऱ्या डॉक्टरवर व परीचारिकांवर जास्त प्रमाणात जास्त प्रमाणावर कोसळत आहे.त्यात आता हि साथ छोटी खेडीही आपल्या मगर मिठीत घेत असल्याचे स्पष्ट होत आहे.नजीक शिर्डीत या रुग्णांनी चाळीशी कधिच ओलांडली आहे.राहाता,वैजापूर,येवला,औरंगाबाद नाशिक,संगमनेर,मालेगाव आदी ठिकाणी कहर उडाला आहे.कोपरगाव तालुक्यात सुरेगावात उच्चांक झालेला आहे.मात्र त्यातील पाचहून अधिक रुग्ण आज नियंत्रणात आले आहे.हि समाधानाची बाब आहे.मात्र आज या तीन रुग्णांनी पुन्हा एकदा कहर उडवून दिला आहे.अशा परिस्थिती नागरिकांनी स्वतःहून काळजी घेणे अपेक्षित आहे.मात्र त्या पातळीवर नागरिकांत शुकशुकाट दिसत असल्याने काळजी वाढली आहे.नगरपरिषद व पोलीस प्रशासन दंडातून लोकांना स्पष्ट इशारा देत असतानाही अद्याप काही तरुण व नागरिक मुखपट्या बांधण्यास टाळाटाळ करताना दिसत आहे.दरम्यान कोपरगाव नगरपरिषद मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन या तीन रुग्ण व या परिसरातील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या संशयित व्यक्तींना आरोग्य विभागाने ताब्यात घेण्यास प्रारंभ केला आहे.व त्यांची रवानगी कोपरगाव येथील विलगीकरण कक्षात करण्यास सुरुवात केली आहे.व हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले असल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर व डॉ.संतोष विधाते यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close