पर्यटन व तीर्थक्षेत्र
खंडोबाची सोमवती अमावस्या साध्या पद्धतीने संपन्न
संपादक-नानासाहेब जवरे
वाकडी-(प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील वाकड़ी ग्रामपंचायत हद्दीतील येथील खंडेराव मंदिरातील सोमवती अमावस्या सोहळा कोरोना साथीच्या भयामुळे अत्यंत साध्या पद्धतीने भक्ताविना साजरा करण्यात आली आहे.
वर्तमानात सर्वत्र कोरोना या गंभीर आजाराने थैमान घातले असताना सर्वत्र मंदिर बंद असुन मोठे उत्सव यात्रा बंद आहे. वाकड़ी येथील खंडोबा मंदिरातील सोमवती अमावश्या सोहळ्यास खंड पडू नये म्हणून कुठलीही मिरवणूक पालखी सोहळा न काढता मोजक्या भाविकांनी सकाळी नऊ वाजता दुचाकीवरुण देवाचे मुखवटे पूणतांबा येथील गोदावरी नदीत स्नान घालण्यासाठी नेले व तेथील पूजा करुण पुन्हा लगेच वाकड़ी येथील खंडोबा मंदिरात दुपारी बारा वाजता येऊन देवाची आरती व पूजा करण्यात आली.
यावेळी खंडोबा मंदिरातील पुजारी संजय घोड़के,दत्तात्रय नेमाने (वाघे),जालिंदर राहींज (वाघे),सावळेराम आहेर,बाळासाहेब लहारे,वसंत डोखे,शरद डोखे आदि मल्हारीभक्त उपस्थित होते.