पर्यटन व तीर्थक्षेत्र
कोपरगावात महादेवाचे ऑनलाइन दर्शन
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव- (प्रतिनिधी)
श्रावण महिन्यात महादेवाचे दर्शन व अभिषेक करण्यासाठी कोपरगाव शहरातील निवारा मित्र मंडळाने ऑनलाईन दर्शन व अभिषेक कार्यक्रमाची व्यवस्था केल्याची माहिती निवारा चॅरीटेबल ट्रस्ट महादेव मंदिराच्या व्यवस्थापक समितीच्या प्रमुख सुहासिनी कोयटे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देतांना त्या म्हणाल्या कि,‘कोरोनाच्या पार्श्वभूभीवर सुरु असलेल्या टाळेबंदी व संचार बंदीमुळे मंदिर उघडे ठेवता येत नाही.त्यामुळे गेली ३५ वर्षाची परंपरा खंडित होणार आहे.गत ३५ वर्षे या महादेव मंदिरात श्रावण महिन्यात भाविकांच्या वतीने दररोज अभिषेक केला जात होता.परंतु टाळेबंदी व संचारबंदीमुळे गत चार महिण्या पासून मंदिर बंद आहे व श्रावण महिन्यात हे मंदिर उघडता येत नाही परंतु दर सोमवारी सर्व भविकांचे वतीने एक जोडपे अभिषेकास बसणार आहे आणि सर्व भाविकांच्या वतीने आलेली एकत्रित करून महादेवास अर्पण करण्यात येईल. हा अभिषेक सर्व भाविकांना ऑन लाईन घरी बघता येईल व मंत्रोच्चार घरी बसून ऐकता येतील. सर्व भाविकांनी आपापल्या घरी सकाळी ८ वा. ताम्हणामध्ये महादेवाची पिंड किंवा सुपारी ठेऊन गुरु सांगतील त्या प्रमाणे आपल्या घरीच महादेवाला बेल,फुले अर्पण करून महादेवास अभिषेक करावयाचा आहे.
अभिनव अशा ऑनलाईन पद्धतीने करावयाच्या अभिषेक पद्धतीचे सर्व भाविक वर्गाकडून कौतुक होत आहे.दर श्रावण महिन्यात निवारा, सुभद्रानगर, ओमनगर,रिद्धी सिद्धी नगर,कोजागिरी कॉलनी,द्वारकानगरी,जानकी विश्व,साईसीटी,समतानगर,शिंदे-शिंगीनगर,आदि परिसरातून मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी व अभिषेकासाठी येत असतात.या सर्वांची या ऑनलाईन पद्धतीने दर्शन व अभिषेकाची सोय केल्याचे मंदिर समितीचे सदस्य बाबासाहेब कापे यांनी शेवटी सांगितले आहे व भिविकांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.