जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पर्यटन व तीर्थक्षेत्र

…या देवस्थानाच्या चरणी चांदीची मूर्ती अर्पण!

न्यूजसेवा

कोपरगांव -(प्रतिनिधी)

   शिर्डी येथील श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा असून,विविध भाविकांकडून श्री साईबाबांच्या चरणी भरभरून वेगवेगळ्या प्रकारचे दान अर्पण केले जाते.आज कर्नाटक राज्यातील उडपी येथील साईभक्त बी.चंद्रशेखर किनी यांनी श्री साईबाबांच्या चरणी श्री साईबाबा महाप्रसाद बनवतांनाची प्रतिमात्‍मक चांदीची मुर्ती अर्पण केली असल्याची माहिती साई संस्थानने दिली आहे.

   सदर चांदीच्या मूर्तीचे एकूण वजन १ किलो २०४ ग्रॅम असून तिची अंदाजे किंमत २ लाख १४ हजार ३१२ इतकी आहे. ही चांदीची मुर्ती श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केल्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने प्रशासकिय अधिकारी अतुल वाघ यांनी देणगीदार साईभक्ताचा  सत्कार करून आभार व्यक्त केले आहे.

चांदीची मुर्ती श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केल्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने प्रशासकिय अधिकारी अतुल वाघ यांनी देणगीदार साईभक्ताचा  सत्कार करण्यात आला तो क्षण.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close