जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पर्यटन व तीर्थक्षेत्र

कास पठारवर रंगली,’कवितांची मैफल’

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

रंगीबेरंगी फुलांच्या दुनियेत,’कास पठार’येथे नुकतीच नक्षञ कास पठार काव्यसहल मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.विविध सजलेल्या फुलांच्या सानिध्यात भटकंती करण्यात आली.परिसरातील तलाव,हिरवेगार डोंगर,अनेक धरणांचे अभांग पाणी,रिमझिम पाऊसधारा,अतिशय सुंदर हिरवीगर्द झाडी,अनेक रंगीबेरींग फुलांची पखरणीने कासपठार फुलेले कवी कवयिञींनी अनुभवले.आणि त्या सृष्टीसौदर्यांने नटलेल्या परिसरात आपली गाणी,शेरोशायरी,कवितांनी या काव्यसहलीत आनंद भरला असल्याचे दिसून आले आहे.

‘कास’हा जैवविविधतेचा हॉटस्पॉट आहे.हे पठार त्यावर ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात फुलणाऱ्या विविध प्रकारच्या रानफुलांसाठी आणि फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे.या पठारावर २८० फुलांच्या प्रजाती व वनस्पती वेली,झुडपे आणि इतर प्रजाती मिळून ८५० प्रजाती आढळतात.पावसाळयात या सडयावर गवत उगवते आणि त्यावर विविधरंगी फुले डोलू लागतात त्याचा आनंद नुकताच प्रा.कवी राजेंद्र सोनवणे यांच्या पुढाकारातून काव्य सहलीने नुकताच मनमुराद घेतला आहे.

‘कास’ हा जैवविविधतेचा हॉटस्पॉट आहे.हे पठार त्यावर ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात फुलणाऱ्या विविध प्रकारच्या रानफुलांसाठी आणि फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे.या पठारावर २८० फुलांच्या प्रजाती व वनस्पती वेली,झुडपे आणि इतर प्रजाती मिळून ८५० प्रजाती आढळतात.पावसाळयात या सडयावर गवत उगवते आणि त्यावर विविधरंगी फुले डोलू लागतात.रस्ता नाही,गाडया नाहीत,पर्यटक नाहीत,त्यामुळे प्रदूषण नाही.येथे आजूबाजूच्या गावांतील पाळीव जनावरे मनसोक्तपणे गवत खातात.त्याचप्रमाणे कुंपण नसल्याने वन्यजीव मनसोक्त विहार करतात.मानवाचा अडथळा नाही,त्यामुळे निसर्गाचे जीवनचक्र अव्याहतपणे चालू आहे.गवताला व फुलांना शेणखत व मूत्रखत मिळते.त्यामुळे येथील गवत व फुले जोमाने वाढतात.निसर्गाचा हा विविधरंगी सोहळा जुलैमध्ये चालू होतो,तो सप्टेंबरपर्यंत पहावयास मिळतो.त्याचा आनंद कवींनी घेण्याचा निर्णय घेतला होता.त्याला चंगलाच प्रतिसाद मिळाला आहे.

त्यात त्यांना कास पठार-अदभूत दुनियेत जाऊन नक्षञांची मने आनंदाने फुलेलेली दिसली.निसर्ग आपला सखा आहे.या भावनेने सर्व नक्षञ या काव्यसहलीत सहभागी होऊन आनंद लुटतांना दिसली.जागतिक दर्जा प्राप्त झालेले हे कास पठार आहे.हा सुंदर फुलांचा परिसर व नैसर्गिक वारसा लाभलेले सौदर्य पर्यटकांना नेहमीच खुणावत असतो.पाऊस सरी.चवर,पंद,आमरी,सोनकी,तेरडा,गेंद,टुथब्रश,निलिमा आदी विविध जाती प्रजातीच्या फुलांच्या रंगीबेरंगी कळ्या फूलु लागल्या आहेत.निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेले मनमोहक कास पठार अनुभवत सर्व नक्षञ आनंदाने बेभान होऊन जीवनाचा खरा आनंद लुटत होती.

या काव्य सहलीला मार्गदर्शन करण्यासाठी कासपठार पर्यटन कायदेसल्लागार अॅड.संजय माने आदी मान्यवर उपस्थित होते.

या कास पठार नक्षञ काव्यसहलीचे उत्तम नियोजन संयोजन कवी वादळकार,पुणे प्रा.राजेंद्र सोनवणे केले होते.विशेष संयोजनात अण्णा जोगदंड,सुभाष चव्हाण,अंजू सोनवणे इ.पुढाकार घेतला.यापुर्वी अनेक काव्यसहलीचे आयोजन व संपन्न केलेले आहे.कवींना आदर व सन्मान मिळावा.त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणुन संस्था गेली २४ वर्षे कार्यकरत आहे.

स्थानिक स्थळांना भेटी देत.या फुलांच्या दुनियेच्या काव्यसहलीत सहभागी झालेले नक्षञ प्रा.शंकर घोरपडे,अण्णा जोगदंड,सुभाष चव्हाण,प्रा.दिलीप गोरे,दिव्या भोसले,अशोक पांढरकर,शिला भुजबळ,अविनाश खेडकर,अंजू सोनवणे,बाळासाहेब पोळ,प्रीती सोनवणे,एम.डी.चौधरी,सुवर्णा मुटके,जयश्री बनकर,अॅड,.सुनिल लोंढे,स्निधा बॅर्नजी,वैशाली आवताडे,कवी वादळकार,अॅड.संजय माने,संगिता जोगदंड,मीना घोरपडे,कु.पूजा आवतडे,सुनंदा चव्हाण,चंद्रकला पोळ,कु.प्राजक्ता पोळ,चि.साईराजे सोनवणे,श्रीकांत जाधव,नंदा चौधरी,अमिता गोरे,श्रध्दा बागडे,कल्पना मुटके,सुमन मुटके,चंदना गायकवाड इ.कवी,कवयिञी,रसिक पर्यटकांनी कासपठार नक्षञ काव्यसहलीत सहभाग घेतला.उत्तम नियोजन नक्षञाचं देणं काव्यमंच व साईराजे टूर्स हाॅलिडेज,पुणे यांनी केल्यामुळे या काव्य सहलीचा पुरेपुर आनंद मिळालाअसल्याची माहिती आमच्या  प्रतिनिधीस दिली आहे.

   सदर प्रसंगी काव्यसहली मध्ये सुप्रसिदध माऊंथ आॅर्नरकार एम.डी.चौधरी यांनी अनेक सुंदर गीतांचे मांऊथ आॅरगनवर वादन करुन मने जिंकली,चि.साईराजे सोनवणे यांनी गिटार वादन करुन विविध सुंदर गाणे गिटारवर वाजवून सर्वांना आनंद दिला.कविवर्य अणणा जोगदंड,कविवर्य सुभाष चव्हाण,कविवर्या दिव्या भोसले,कविवर्य अशोक पांढरकर,कविवर्य शंकर घोरपडे,कविवर्या जयश्री बनकर,प्रीती सोनवणे,कविवर्य अविनाश खेडकर,स्निगधा बर्नजी,कविवर्य रामचंद्र पंडीत,यांनी सुंदर काव्यसादर करुन मैफलमध्ये बहार आणली.

सर्व नक्षञ दिवसभर निसर्गाचा आनंद घेत,फुलांचा सुगंध मनात दरवळत ठेवून,मनात आठवणीत साठवत परतीच्या प्रवास करुन आनंदी मनाने सुरक्षित घरी पोहचले आणि या कासपठार सहलीचा आनंद घेतला आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close