जाहिरात-9423439946
धार्मिक

जगाच्या कल्याणासाठी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी मराठी भाषेत लिहिली-प्रतिपादन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

ग्रंथराज ज्ञानेश्वरी ही एक अमृतवाणी अन ब्रह्मवाणी आहे.जगाच्या कल्याणा करता संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी मराठी भाषेत लिहिलेली असली तरी त्यामध्ये छप्पन भाषांचा संदर्भ असून अशा अप्रतिम ग्रंथराज ज्ञानेश्वरी चे पारायण म्हणजे राज्यातील भाविकांसाठी एक महापर्वणी असल्याचे प्रतिपादन ह.भ.प.संजय महाराज जगताप यांनी नूकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“ग्रंथराज ज्ञानेश्वरीची प्रतिशुद्धी म्हणजे जयंती नुकतीच साजरी होत आहे.ग्रंथराज ज्ञानेश्वरी ही संत ज्ञानेश्वर माऊलीच आहे.त्यामुळे अशा ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे दर्शन,पूजन व आत्मिक,अध्यात्मिक ज्ञान घेतले पाहिजे”-ह.भ.प.संजय महाराज जगताप.

येवला तालुक्यातील अंदरसुल येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंतीनिमित्त व वै.ह.भ.प.सुभाष महाराज पाठक अंदरसुलकर यांच्या तृतीय पुण्यस्मरण निमित्त आयोजित कीर्तन महोत्सव आयोजित केला आहे त्या निमित्त झालेल्या प्रवचनात सेवेत ते बोलत होते.


सदर प्रसंगी संजय महाराज जगताप पुढे म्हणाले की,”ईश्वर शक्तीने हे विश्व निर्माण केले आणि अशा भगवान ईश्वराची अमृतवाणी,ब्रह्मवाणी म्हणजेच भगवतगीता व मराठीत ज्ञानेश्वरी आहे.व तीही ईश्वररूप आहे.गीतेचे ७०० श्लोक आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी ही संत ज्ञानेश्वर रूपातच आहे.आळंदीला संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आहे.मात्र तेथे जाऊन दर्शन घेणे शक्य झाले नाही तर घरात असणाऱ्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथाचे दर्शन घेतले तरी संत ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन झाल्यासारखे आहे.अशा ग्रंथराज ज्ञानेश्वरीची प्रतिशुद्धी म्हणजे जयंती ०४ ऑक्टोबरला असून अलौकिक अशा या ग्रंथाची निर्मिती जगाच्या कल्याणाकरता संत ज्ञानेश्वर महाराजांनी केली आहे.त्यामुळे ग्रंथराज ज्ञानेश्वरी ही प्रत्यक्षात एक ब्रह्मज्ञानाची अनुभूती मिळून देणारी आहे.जगात अनेक संत,पंथ आहेत,अनेक भाषा आहेत.मात्र संत ज्ञानेश्वर महाराजांनी साडेसातशे वर्षांपूर्वी लिहिलेली व तिन्ही काळाचे त्यात ज्ञान असणारी अध्यात्मिक अशा सर्व व्यापक ज्ञान असणाऱ्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीत सुमारे ५६ भाषांचा संदर्भ येतो.त्यामुळेच अनेक संत महात्मा ऋषीमुनी यांनी गीता व ज्ञानेश्वरीचा अलौकिक ग्रंथ म्हणून उल्लेख केलेला आहे.गीतेची व्यासांनीही थोरवी गायली आहे.व्यासमुनी स्वतः गीतेला अलंकार चढवला आहे.व्यास मुनी हे ब्रह्म,विष्णू,महेशचे प्रतिकअसणारी एक देवता आहे.त्यामुळेच व्यासमुनींनी श्री गणपती बाप्पाला बरोबर घेऊन सव्वा लाख श्लोक असणारी महाभारत ग्रंथाची निर्मिती केली.गणेश बुद्धीची देवता आहे.नुकताच आपण गणेशोत्सव मोठा उत्साहात साजरा केला आहे. ब्रह्मवाणी असलेल्या भगवतगीतेचे तीन वक्ते व तीन श्रोते खऱ्या अर्थाने सांगितले आहे.त्यामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता उपदेश केला.कारण गीतेचा ब्रह्म वाणीचा संदेश ऐकणारा स्वतःही तसा योग्य असला पाहिजे व अर्जुन हे एक परमेश्वराचेच रूप असल्यामुळे व ते गीता उपदेश ऐकण्यास पात्र असल्यामुळे त्यांना भगवान श्रीकृष्णाने गीता उपदेश केला म्हणून श्रीकृष्ण वक्ते व अर्जुन श्रोते होते.त्याचप्रमाणे कुरुक्षेत्रावर महाभारताचे युद्ध सुरू असताना संजयने धृतराष्ट्राला तेथील युद्धाचे सर्व वर्णन जसेच्या तसे आजच्या दूरदर्शन प्रमाणे सांगितले.त्यामुळे तेथे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेला गीता उपदेशही संजयने धृतराष्ट्राला त्यावेळी सांगितला.याचा अर्थ संजय हे वक्ते होते व धृतराष्ट्र श्रोते होते.कारण तेही एक ईश्वर रूप होते.

दरम्यान व्यासमुनींनी महाभारत ग्रंथ निर्माण करताना बुद्धीची देवता गणपतीला बरोबर घेतले व लेखन केले व्यासांनी सांगितले व गणपती बाप्पांनी ते लिहिले.तसेच भगवतगीता संदर्भात आपण बोलावे म्हणून खुद्द गुरूंनी संत ज्ञानेश्वर माऊलींना सांगितले व संत ज्ञानेश्वर माऊलींनी गीते संदर्भात चर्चा केली होती.संत निवृत्तीनाथ महाराजांनी ‌ती ऐकली.त्यावेळीही हे ब्रह्म ज्ञान व्यक्त झाले व श्रवण झाले.म्हणजे गीतेचे संत ज्ञानेश्वर माऊली हे वक्ते झाले व संत निवृत्तीनाथ महाराज हे श्रोते बनले.सध्याही भगवतगीता किंवा ज्ञानेश्वरी असो.तीचा उपदेश करणारा वक्ता व ऐकणारा श्रोत्यांचा भाव हा एकरूप असला पाहिजे.अध्यात्मिक ज्ञान हा पारायण कीर्तन प्रवचन असो,कोणताही धर्म कार्यक्रम असो,जो तल्लीन होऊन आत्मसात करतो त्याला नक्कीच ईश्वरी अनुभवाची प्रचिती येते.म्हणूनच असे आध्यात्मिक ज्ञान व ते सरळ सोप्या भाषेत संत ज्ञानेश्वर माऊलींनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथातून सर्वांना उपलब्ध करून दिले आहे व या ग्रंथराज ज्ञानेश्वरीची प्रतिशुद्धी षष्ठीला झाली.तिची जयंती ०४ ऑक्टोबर रोजी असून त्यानिमित्ताने ग्रंथराज ज्ञानेश्वरी हीच संत ज्ञानेश्वर माऊली आहे.सध्या पितृपक्ष सुरू आहे.हा पर्व काळ समजला जातो.

आपल्या पितरां पितृपक्षात भोजन देऊन तृप्त केले जाते.पितरांची उपासना केली जाते.सर्वात प्रथम संत ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या पितंराना प्रथम बोलावून श्रीक्षेत्र पैठण येथे त्यांना महाप्रसाद देऊन त्यांची उपासना केली.त्यानंतर संत एकनाथ महाराजांनी पैठण येथे आपल्या पितरांना बोलावून त्यांची उपासना केली.असा हा पितृपक्षाचा पर्वकाळ असून ज्ञानेश्वरी ग्रंथांची प्रति शुद्धी म्हणजे जयंती या षष्ठीला आहे.अशा ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथाची संत ज्ञानेश्वर माऊली म्हणूनच आपण या दिवशी दर्शन घेऊन पूजा केली पाहिजे. असेही ह.भ.प.संजय महाराज जगताप यांनी शेवटी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close