जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
दळणवळण

..या राष्ट्रीय महामार्गावर उड्डाण पूल करा-खा.वाकचौरेंची मागणी

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)

केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची नुकतीच शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी भेट घेऊन संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रिय महामार्ग चंदनापुरी (गाभणवाडी) परिसरातील अपघात रोखण्यासाठी नव्याने उड्डाणपूल होणे गरजेचे असल्याची मागणी केली आहे.या मागणीचे नागरिकानी स्वागत केले आहे.

  

“नाशिक पुणे महामार्गावर असलेल्या हिवरगाव पावसा येथील टोल प्रशासनाचा मन-मानी कारभार करत असून अनेक प्रवाशांना त्याचा जाच होत आहे.त्यामुळें स्थानिक नागरिकांना होणारा त्रास कमी होण्यासाठी त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन खा.वाकचौरे यांचेकडे सोपवले होते त्यावर त्यांनी मंत्री गडकरी यांचेकडे ही मागणी केली आहे.

   राज्यभरातील दळणवळण व्यवस्था बळकट करण्यासाठी ‘एमएसआरडीसी’ने ४,२१७ कि.मी.चे महामार्गाचे जाळे विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.यातीलच एक म्हणजे पुणे ते नाशिक औद्योगिक महामार्ग मानला जात आहे.अंदाजे २० हजार कोटी रुपये इतका अपेक्षित खर्च असलेल्या या १८० किमीच्या महामार्गामुळे पुणे ते नाशिक अंतर कमी वेळेत पार करता येणार आहे.महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मार्गदर्शक तत्वांचा अभ्यास करून प्रत्यक्ष स्थळ पाहणीनुसार विविध पर्यायी आखणींचा अभ्यास केला आहे.प्रस्तावित द्रुतगती महामार्गाची आखणी रेषा राजगुरूनगर,चाकण,मंचर,नारायणगाव,आळेफाटा,घारगाव,संगमनेर आणि सिन्नर अशा महत्त्वाच्या शहरांजवळून प्रस्तावित आहे.पुणे ते नाशिक औद्योगिक महामार्ग बांधण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) जून २०२३ मध्ये घेतला होता.

   आराखड्यासाठी नेमलेल्या सल्लागार संस्थेने नुकताच अहवाल सादर गेल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाच्या २१३ किलोमीटर लांबीच्या अंतिम आखणीस मान्यता देत रस्ते विकास महामंडळावर बांधणीची जबाबदारी सोपविली आहे.त्याचे भूसंपादन बहुतांशी करणेत आले आहे.त्याला काही ठिकाणी विरोध होत आहे.वर्तमानात तो अनेक हिंदोळ्यावर आहे.यामुळे पुणे ते नाशिक अंतर पाच तासांवरून केवळ तीन तासात पार करता येणे शक्य असून,पुणे,नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांच्या औद्योगिक विकासाला चालना मिळनार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पहिल्या पत्रकर परिषदेत सदर मार्ग करण्याचे सूतोवाच केले आहे.त्यामुळे अनेक नागरिकांना तो निर्णय त्रासदायक ठरत असल्याचे दिसून येत आहे.

   सदर मार्गावर रायतेवाडी परिसरात होत असलेल्या उड्डाणपुला मुळे स्थानिक व्यावसायिकांवर मोठया प्रमाणावर परिणाम होऊन ते आर्थिक अडचणीत येऊ शकतात असा काहींचा होरा आहे.तो टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात तसेच सर्व्हिस रोड साठी अतिरिक्त जमीन अधिग्रहण करण्यात आलेली आहे माञ अद्याप देखील शेतकऱ्यांना त्याच्या मोबदला मिळालेला नाही असा आरोप काही शेतकऱ्यांनी केला आहे.तो शेतकऱ्यांना तात्काळ मिळावा अशी मागणी खा.वाकचौरे यांनी नुकतीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेकडे केली आहे.

   दरम्यान नाशिक पुणे महामार्गावर असलेल्या हिवरगाव पावसा येथील टोल प्रशासनाचा मन-मानी कारभार करत असून अनेक प्रवाशांना त्याचा जाच होत आहे.त्यामुळें स्थानिक नागरिकांना होणारा त्रास कमी होण्यासाठी त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन खा.वाकचौरे यांचेकडे सोपवले होते त्यांनी ते रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचेकडे सोपवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close