कोपरगाव तालुका
महावितरणच्या अडचणी साठी उर्जा विभागाकडे पाठपुरावा करू आ. काळे
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील नागरिकांनी महावितरण कंपनीच्या बाबत मांडलेल्या तक्रारीची दखल घेवून आ. आशुतोष काळे यांनी रोजी कोपरगाव येथे महावितरण कंपनीच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेवून येत असलेल्या अडचणी जाणून घेत अधिकाऱ्यांना येत असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी उर्जा खात्याकडे पाठपुरावा करू असे या बैठकीत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना आश्वासित केले आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील नागरिकांना येत असलेल्या सर्व शासकीय कार्यालयातील अडचणी तातडीने सुटाव्या या उद्देशातून आ. आशुतोष काळे यांनी जनता दरबार सुरु केला आहे. आजपर्यंत घेण्यात आलेल्या जनता दरबारात नागरिकांनी सर्वात जास्त अडचणी महावितरण कंपनीच्या बाबतीत मांडल्या होत्या. यातून मार्ग काढण्यासाठी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेणार असल्याचे आश्वासित केले होते.त्या प्रमाणे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आ.काळे यांनी शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने व सुरळीत विजपुरवठा व्हावा यासाठी महावितरण कंपनीला येत असलेल्या अडचणी जाणून घेतल्या. त्याचबरोबर मतदार संघातील शेतकऱ्यांचे विद्युत मोटारीचे वीज जोड असलेले अनेक रोहित्र जळालेले व नादुरुस्त आहेत.
उन्हाची तीव्रता वाढत आहेत, शेतकऱ्यांचे गहू,कांदे,मका, फळबागा आदी पिके अंतिम टप्प्यात असून या पिकांना पाणी मिळावे यासाठी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी. नादुरुस्त रोहित्र वेळेवर बसवून वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करावे.शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना सहकार्य करावे.कोपरगाव शहरातील औद्योगिक वसाहतीतील व्यावसायिकांना पूर्ण क्षमतेने विंना खंडीत वीज पुरवठा करावा, घरगुती वीज ग्राहकांना वीज पुरवठा करतांना वारंवार भारनियमन करू नये, जिल्हा परिषद शाळेच्या आवारात असलेल विजेचे पोल व विजेच्या तारा दुसरीकडे स्थलांतरीत कराव्या तसेच कोपरगाव शहरातील ज्या घर, इमारतीवरून विजवाहिन्या गेल्या आहेत त्याचा सर्व्हे करून त्या वीज वाहिन्या स्थलांतरीत करण्यासाठी प्रस्ताव तयार करावे आदी विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.त्याचबरोबर महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी देखील त्यांना येत असलेल्या अडचणी आ. काळे यांच्यापुढे मांडल्या. या अडचणी समजावून घेत उर्जा खात्याकडे पाठपुरावा करून या अडचणी सोडविण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे आ.काळे यांनी सांगितले.
या वेळी महावितरणचे उपअभियंता दिनेश चावडा,भगवंत खरोटे,तुषार सूर्यवंशी व मतदारसंघातील विविध उपकेंद्रांचे सर्व सहाय्यक अभियंता या बैठकीसाठी उपस्थित होते.