खेळजगत

कोपरगावात विविध क्रीडा स्पर्धेत…या विद्यालयाचे यश

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

अ.नगर येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व कोपरगाव तालुका क्रीडा समितीच्या वतीने शालेय तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या असून या स्पर्धेत कोपरगाव येथील संत जनार्दन स्वामी महाराज महर्षी स्कूलच्या खेळाडुनी लक्षवेधी यश संपादन केले आहे त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संकल्पित छायाचित्र.

दरम्यान १९ वर्षातील मुलांच्या गटामध्ये सुवर्णपदक पार्थ महेश सांळुके तर रजत पदक-उज्वल बिपीकुमार पाटणी तर मुलींमध्ये श्रीभावना पूनकुला हिने रजतपदक मिळविले आहे या खेळाडुंची निवड विभागीय तलवारबाजी स्पर्धेसाठी झाली आहे.तसेच अॅथलेटीक्स स्पर्धेत ही लक्षणीय कामगिरी करत खेळाडुनीं तालुकास्तरीय स्पर्धेत यश मिळविले आहे.यशस्वी खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

या मध्ये जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत कु.समृद्धी राजेंद्र कोहोकडे हिने १७ वर्षे मुलींच्या गटात जिल्हयात द्वितीय क्रमांक मिळविला आहे.तर नागासाई गुंडा याने पाचवा क्रमांक मिळविला या दोघांची निवड विभागिय बुद्धीबळ स्पर्धेसाठी झाली आहे.तसेच जिल्हास्तरीय थ्रोबॉल स्पर्धेत १९ वर्षातील मुलांचा संघ विजयी झाला आहे.या संघात संघ नायक ओम मते,दर्शन जपे,सार्थक घोटेकर,आकाश वाणी,मल्हार देवकर,ओमकार सालकर,गिरीश जाधव, वेदांत शेटे,ओम कोते,सैद अत्तार,महेंद्र कर्पे,पृथ्वीराज जावळे,यांनी उत्कृष्ट कामगिरी केली तसेच १४,१७ वर्षातील मुलामुलींच्या संघांनी द्वितीय क्रमांक मिळविला
आहे.
दरम्यान श्री सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालय येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेत लक्षवेधी यश संपादन केले आहे.या मध्ये १४ वर्षातील मुलांमध्ये सुवर्ण पदक,दुर्वेश वैभव जोशी आणि विश्वजित समिर पवार तर रजतपदक चैतन्य नितीन पवार,तिर्थ अतुल कोताडे,आयुष गहीनीनाथ पोकळे,कास्यपदक-अर्चित प्रशांत कडु,तनिष्क सुधाकर निकुंभ तर १४ वर्षातील मुलींमध्ये कु.ज्ञानदा राजेंद्र सोनवणे सुवर्णपदक रूद्रा पियुष पटेल सुवर्ण पदक मिळविले.तसेच १७ वर्षातील मुलांमध्ये सुवर्णपदक-मल्हार ऋषीकेश देवकर,ध्रुव विशाल जैन आणि साईनाथ दिपक बलमे तर प्रणव कृष्णदास अहीरे याने रजत पदक तर वेंदात विजय शेटे,कास्यपदक मिळविले आहे.१७ वर्षातील मुलींच्या गटात प्राची हरिष पटेल आणि शर्वरी गणेश हासे यांनी सुवर्ण पदक तर अहना भुषण शिरोडे कांस्य पदक पटकविले.

१४ वर्षे मुले संग्राम दिपक जगताप-२०० मिटर धावणे-तालुक्यात प्रथम सिद्धार्थ चेतन बनकर-गोळाफेक मध्ये तृतीय तर १४ वर्षे मुली लांबउडी मध्ये ज्ञानदा राजेंद्र सोनवणे तालुक्यात प्रथम तर ॠतुजा कैलास क्षीरसागर द्वीतीय आली आहे.

दरम्यान १७ वर्षे मुले लांबउंडी मध्ये-पवन रमेश धाटबले तालुक्यात प्रथम तर १७ वर्षे मुलींमध्ये १५०० मी.धावणे,समिक्षा रविंद्र शिंदे हिने प्रथम कमांक पटकाविला आहे.

या शिवाय १९ वर्षातील मुलांमध्ये थालीफेकमध्ये सरफराज शकील शेख याने द्वितीय कमांक मिळविला आहे.१९ वर्षातील मुलींमध्ये गोळाफेक मध्ये गायत्री कैलास लोहकणे तालुक्यात प्रथम क्रमांक तर मुस्कान मनोज मोटवाणी हिने भालाफेक मध्ये द्वीतीय क्रमांक मिळविला आहे.

दरम्यान या सर्व खेळाडुंची जिल्हास्तरीय अथलेस्टिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे.नुकत्याच शालेय ज्युदो व कराटे स्पर्धा संपन्न झाल्या यामध्ये साहील योगेश गाडेकर तृतीय तर मुलींमध्ये तेजस्वीनी प्रमोद बारवे द्वीतीय तर भार्गवी राहुल बोऱ्हाडे आणि मिथीलेश संजय लोहारकर यांनी तृतीय क्रमांक मिळविला आहे.

या सर्व गुणवंत विदयार्थ्याचे संत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेशगिरी महाराज,संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय होळकर,उपाध्यक्ष विलास कोते,सचिव अंबादास अत्रे,विश्वस्त भाऊ पाटील,रामकृष्ण कोकाटे,अॅड.अनिल जाधव,आशुतोष पानगव्हाणे,संदिप चव्हाण,अतुल शिंदे,शिवनाथ शिंदे तसेच विद्यालयाचे प्राचार्य,प्रशासकीय अधिकारी डॉ.श्रीरंग झावरे व सर्व शिक्षक वृंदानी अभिनंदन केले आहे.यशस्वी विद्यार्थ्याना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक शिवप्रसाद घोडके,योगेश बिडवे व गणेश वाकचौरे,प्रिया बोधक यांचे मार्गदर्शन लाभले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close