खेळजगत
राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत…या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
नुकत्याच मुंबई येथे संपन्न झालेल्या रंगोत्सव सेलिब्रेशन संस्थेतर्फे राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या रंगभरण आणि हस्ताक्षर स्पर्धेत समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एकूण ५५ पदके मिळवित लक्षवेधी यश संपादन केल्याची माहिती समता इंटरनॅशनल स्कूलच्या विश्वस्त स्वाती कोयटे यांनी दिली आहे.
समता इंटरनॅशनल स्कूलच्या प्राथमिक व माध्यमिक विभागातील इ.१ ली ते इ.१० वीचे विद्यार्थी सहभागी झाले होते.सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी रंगभरण आणि हस्ताक्षर प्रकारात सुवर्ण,कास्य,रजत अशी ५५ पदके मिळविली आहेत.रंगभरण स्पर्धेत २८ आणि हस्ताक्षर स्पर्धेत २७ पदकांचा समावेश आहे.त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मुंबई येथील रंगोत्सव सेलिब्रेशन संस्थेतर्फे राष्ट्रीय पातळीवरील २०२२-२३ या वर्षीच्या रंगभरण आणि हस्ताक्षर स्पर्धांचे आयोजन ऑगस्ट महिन्यात करण्यात आले होते.या स्पर्धांमध्ये समता इंटरनॅशनल स्कूलच्या प्राथमिक व माध्यमिक विभागातील इ.१ ली ते इ.१० वीचे विद्यार्थी सहभागी झाले होते.सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी रंगभरण आणि हस्ताक्षर प्रकारात सुवर्ण,कास्य,रजत अशी ५५ पदके मिळविली आहेत.रंगभरण स्पर्धेत २८ आणि हस्ताक्षर स्पर्धेत २७ पदकांचा समावेश आहे.समताच्या आर्ट मेरिट मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह आणि आकर्षक बक्षिसे देऊन सत्कार करण्यात आला आहे. यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना कला विभागाच्या प्रमुख विभावरी नगरकर आणि कला शिक्षक,शिक्षिका यांचे मार्गदर्शन लाभले होते.
समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश कोयटे,मुख्य कार्यवाहक संदीप कोयटे,उपप्राचार्य समीर अत्तार यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.