जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

सामाजिक संकेतस्थळावरील ओळख नडली,तरुणीची फसवणूक,कोपरगावात गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेली तरुणीची ‘शादी डॉट कॉम’या संकेतस्थळावरून वरून एका तरुणांची ओळख झाली त्याचे रूपांतर प्रेमात झाले मग सदर तरुणी महिनाभर सदर आरोपी बरोबर राहिल्यावर लक्षात आले की,सदर तरुण विवाहित असून त्याला बायको व मुलगी आहे.व बायको कॅन्सरने मयत झाली नसून आपण फसलो गेलो आहोत.त्यानंतर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन सदर तरुणीने आरोपी राहुल पाटील रा.गरखेडा परिसर औरंगाबाद याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सामाजिक संकेतस्थळावरून फसवणुकीचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असून तरुणीची इंन्स्टाग्राम वरून ओळख करून आपण अविवाहित आहोत अशी बतावणी करून तरुणीस तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला आपल्या सोबत महिनाभर राहण्यास भाग पाडले व त्यानंतर तिच्या लक्षात आले की,सदर तरुणाने आपल्याला फसवले आहे.तो विवाहित असून त्याच्या पत्नीचे कॅन्सरने निधन वैगरे काही झालेले नाही.त्यानंतर फसवलेल्या तरुणीला आपल्या डोक्याला हात लावण्याचा अनास्था प्रसंग गुदरला आहे.

सोशल मीडियावरून होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.त्यामध्ये बनावट प्रोफाइल तयार करणे, बदनामीकारक मजकूर टाकणे,अकाउंट हॅक करून अश्लिल पोस्ट टाकणे,खंडणी,बँक खात्यावरून रकमा उडवणे,अश्लिल व्हिडिओ अपलोड,फोटो मॉर्फिंग,दोन जातींमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट अशाप्रकारच्या गुन्ह्यांच्या सर्वाधिक तक्रार सायबर सेलकडे येत आहेत.गेल्या काही वर्षांत घडलेल्या सायबर गुन्ह्यांमध्ये सोशल मीडियावरून होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण १६-२० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे.त्यामुळे फेसबुकवरून होणाऱ्या गुन्ह्यांच्या तक्रारीचे प्रमाण सर्वाधिक आहे.सोशल मीडियावरील वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

प्रत्येक नागरिकाच्या हातामध्ये मोबाइल व इंटरनेट आले आहे.त्यामुळे सोशल मीडिया वापरणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे.परिणामी सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे.फेसबुक,इन्स्टाग्राम,ट्विटर,व्हॉट्स अॅप व इतर सोशल मीडियावरून वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे केले जात आहेत.अशीच घटना कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून तरुणीची इंन्स्टाग्राम वरून ओळख करून आपण अविवाहित आहोत अशी बतावणी करून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तरुणीस तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला आपल्या सोबत महिनाभर राहण्यास भाग पाडले व त्यानंतर तिच्या लक्षात आले की,सदर तरुणाने आपल्याला फसवले आहे.तो विवाहित असून त्याच्या पत्नीचे कॅन्सरने निधन वैगरे काही झालेले नाही.

दरम्यान हि घटना घडली ती दि.३० ऑगष्ट ते २५ नोव्हेंबर रोजी दरम्यान.त्यावेळी वेळ निघून गेली होती.मात्र तिने वेळ न घालवता आरोपी बरोबर राहण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने फिर्यादी तरुणीशी जवळीक साधण्याच्या उद्देशाने ‘फेसबुक’ ‘इंन्स्टाग्राम’आदी सामाजिक संकेतस्थळावर पोस्ट टाकून फिर्यादी तरुणीची बदनामी करण्याच्या उद्देशाने बदनामीकारक मजकूर टाकून फिर्यादी तरुणीचा पाठलाग करत होता.बाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात नुकताच फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी प्रभारी पोलीस निरीक्षक आव्हाड यांनी भेट दिली आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी गु.क्रं.४७३/२०२२ भा.द.वि.कलम ३५४ (ड),५००,आय.टी.ऍक्ट २०००चे कलम ६६ (सी) ६७ प्रमाणे आरोपी तरुण राहुल पाटील उर्फ दामोदर पाटील रा.प्लॉट क्रं.७५ गल्ली क्रं.२ मातोश्री नगर पुंडलिक नगर पांडुरंग कृपा जनरल स्टोअर गारखेडा परिसर औरंगाबाद याचे विरुद्ध काल दुपारी ३.३२ वाजता गुन्हा दाखल झाला आहे.पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close