खेळजगत
कोपरगावातील…या विद्यार्थिनीने पटकावले सुवर्ण पदक
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील श्री.सदगुरु गंगागीर महाराज महाविद्यालयामधील ११ वी विज्ञान वर्गातील विद्यार्थिनी कु.उत्कर्षा राजू गावित हिने झारखंड राज्यातील रांची जिल्ह्यातील लोहरगज येथे दिनांक २८ ते ३१ जुलै २०२२ या कालावधीत संपन्न झालेल्या १६ व्या राष्ट्रीय जम्प रोप स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावत नेत्रदीपक कामगिरी केली आहे.तिच्या या यशाबद्ल सर्वत्र कौतुक होत आहे.
या स्पर्धेत देशातील एकूण ८ राज्यांतील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या उत्कर्षाच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश सानप यांनी तिचे अभिनंदन केले आहे.
ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा.रामभाऊ गमे,वरिष्ठ कला विभागाचे उपप्राचार्य डॉ.सुभाष रणधीर,विज्ञान विभागाचे उपप्राचार्य प्रा.अरुण देशमुख,वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ.विजय निकम,कर्यालयीन अधीक्षक सुनील गोसावी आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी तसेच उत्कर्षाचे कुटुंबिय,नातेवाईक यांनीही तिचे अभिनंदन केले आहे.ज्युनिअर जिमखाना प्रमुख प्रा.एस.एस.जंगम,प्रा.आकाश लकारे यांचे या खेळाडूला मार्गदर्शन लाभले होते.