खेळजगत
कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी जिम्नास्टिक प्रकारात तांबोळीची निवड

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
गौतम पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेवून भारतीय नेव्ही मध्ये कार्यरत असलेला माजी विद्यार्थी सैफ सादिक तांबोळी याची इंग्लंड येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी जिम्नास्टिक या प्रकारात भारतीय संघात निवड झाली असून नुकताच तो इंग्लंडला रवाना झाला आहे.त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सैफ तांबोळी हा कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील गौतम पब्लिक स्कूलचा माजी विदयार्थी असून तो नासिक जिल्ह्यातील मनमाडचा रहिवासी आहे.खेळाडू घडविणारे शैक्षणिक संकुल अशी जिल्ह्यात नव्हे तर राज्यात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या गौतम पब्लिक स्कूलमध्ये सैफ तांबोळी याने आपले प्राथमिक एच.एस.सी.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.
इंग्लंड देशातील बर्लिन्गम येथे उद्या (दि.२८) पासून कॉमनवेल्थ स्पर्धेस प्रारंभ होत आहे.या स्पर्धेसाठी भारतीय संघाचे खेळाडू इंग्लंडला रवाना झाले आहेत.यात सर्व प्रकारच्या खेळाडूंचा समावेश असून जिम्नास्टिक या प्रकारात भारताच्या संघात मनमाडच्या सैफ तांबोळीची निवड करण्यात आली आहे.
सैफ तांबोळी हा कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील गौतम पब्लिक स्कूलचा माजी विदयार्थी असून तो नासिक जिल्ह्यातील मनमाडचा रहिवासी आहे.खेळाडू घडविणारे शैक्षणिक संकुल अशी जिल्ह्यात नव्हे तर राज्यात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या गौतम पब्लिक स्कूलमध्ये सैफ तांबोळी याने आपले प्राथमिक एच.एस.सी.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. लहानपणापासुनच जिम्नास्टिकची आवड असलेल्या सैफला गौतम पब्लिकच्या स्कूलच्या माध्यमातून चांगले व्यासपीठ मिळाले.त्या संधीचा फायदा घेवून आपली आवड जोपासत त्याने अनेक स्पर्धा गाजवून गौतम पब्लिक स्कूलचे नाव राज्यात झळकविले आहे.उत्कृष्ठ जिम्नास्टिकपटू म्हणून त्याची राज्यात ओळख निर्माण होवून तो सध्या भारतीय नेव्ही मध्ये कार्यरत आहे.
आपल्या देशाची जर्सी घालून आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करायचे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते.त्यासाठी त्या खेळाडूला योग्य मार्गदर्शन व योग्य व्यासपीठ मिळणे तेवढेचे गरजेचे असते.हे काम ग्रामीण भागात असलेल्या गौतम पब्लिक स्कूलने प्रशिक्षण करतांना प्राथमिक स्वरूपातील मार्गदर्शन करून त्याचा पाया भक्कम करण्याचे काम केले आहे.त्यामुळे सैफ तांबोळीला देशात सर्वोत्कृष्ट जिम्नास्टिकपटू होण्यासाठी संधी उपलब्ध झाली असल्याचे बोलले जात आहे.
गौतम पब्लिक स्कूलमध्ये शिकत असतांना विभाग,राज्य,आंतरराज्य त्यानंतर देशपातळीवर जिम्नास्टिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानमुळे त्याला भारतीय नेव्ही मध्ये नोकरी मिळाली.नोकरी करत असताना त्याने आपला सराव पुढे सुरूच ठेवला त्याचे फळ म्हणून आज तो कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये सैफ नक्कीच पदक पटकवणार असा त्याच्या प्रशिक्षकांना विश्वास आहे.गौतम पब्लिक स्कूलच्या परिवाराकडून देखील सैफ तांबोळीला शुभेच्छा दिल्या आहेत.महाराष्ट्रातून पहिल्यांदा कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी सैफ तांबोळीची निवड होणे हि गौतम पब्लिक स्कूलसाठी अभिमानाची बाब आहे.त्यासाठी त्यास संस्थेचे अध्यक्ष माजी आ.अशोक काळे,उपाध्यक्ष छबुराव आव्हाड,विश्वस्त आ.आशुतोष काळे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.