खेळजगत
एसटी महामंडळाच्या चांगल्या खेळाडूंना भविष्यात प्राधान्य देणार – रणजितसिंह देओल
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागात उत्कृष्ट कामाबरोबर उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंना भविष्यात प्राधान्य देणार असल्याचे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल यांनी नुकतेच कोकमठाण येथे एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले आहे.
सैनिक सिमेवर गेल्यानंतर देशाची सेवा करीत लढता लढता विजयाच झेंडा फडकावतो किंवा स्वतःचे बलीदान देत त्याच झेंड्याला लपेटला जातो. प्रत्येकांनी देशाभिमान बाळगून देशसेवा करावी. -दिपचंद
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाच्या परिसरात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अहमदनगर विभाग अहमदनगर व आत्मा मालिक शैक्षणिक क्रीडा संकुलाच्या विद्यमाने एस टी महामंडळ विभागातील कर्मचाऱ्यांच्या ५६ व्या वार्षिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी रणजीतसिंह देओल प्रमुख पाहुणे बोलत होते.
सदर प्रसंगी ओमगुरूदेव माऊली समवेत कारगिल युध्दातील विर योध्दा लान्स नायक दिपचंद,दुहेरी हिंद केसरी विजेते पैलवान. चंद्रहार पाटील,राज्य परिवहन महामंडळाचे प्रताप पवार, सतिष उजैनकर,सुधीर पंचभाई,महादेव काळे, विजय गिते, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ध्यान पिठाचे परमानंद महाराज, निजानंद महाराज, विवेकानंद महाराज सह सर्व संत मांदीयाळी, अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी,कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश भट,बाळासाहेब गोर्डे, वसंत आव्हाड, प्रकाश गिरमे, आदीं प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
एसटी महामंडळाचे कर्मचारी वयाची व कामाची पर्वा न करता खेळ खेळणारे आहेत याचा अभिमान आहे.एसटीखेळाडुंना ६ महीण्याची क्रिडा सुट्टी दिली तर हेच खेळाडू अॅलंपिकमध्ये चमकतील – चंद्रहार पाटील
एसटी महामंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या ५६ व्या वर्षी क्रीडा स्पर्धेसाठी राज्याच्या ३५ जिल्ह्यातील ३१ विभागातील १ लाख ५ हजार कर्मचाऱ्यांपैकी ७६१ खेळाडूंची निवड करण्यात आली असून त्यामध्ये ६६२ पुरुष तर ९९ महिला खेळाडूंचा सहभाग आहे. या स्पर्धामध्ये लांब उडी उंच उडी थाळीफेक गोळा फेक भालाफेक कुस्ती धावणे अशा विविध वैयक्तिक खेळाडूंसह कबड्डी खो-खो अन्य सांघिक खेळांच्या स्पर्धांचा समावेश आहे. या उदघाटन प्रसंगी संत परमानंद महाराज म्हणाले की, मैदानावर हरणे व जिंकणे यापेक्षा इथे स्पर्धा स्वतःशी स्वतःच्या जीवनाची असावी,विचाराची,अस्तित्वाची असावी आणि स्वता:ला सिद्ध करण्यासाठी माणसाने जीवन रुपी मैदानावरती खेळावे.आत्मालीकच्या पवित्र भूमीत ३५ जिल्ह्यातील खेळाडू आत्मरुपी सामील झाले आहेत.अहोरात्र इतरासाठी प्रवाशी सेवा करणारे हे एसटी कर्मचारी खेळाडूंच्या पाल्यांच्या भविष्याची जबाबदारी महामंडळाने स्विकारावी असे सांगून सतत प्रवासांच्या सेवेत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी स्वतःसाठी दोन मिनिट देऊन ध्यान करावे असे आवाहन केले.
या स्पर्धेचा शुभारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. क्रीडा स्पर्धेच्या ध्वजाला मानवंदना देऊन खेळाडूंच्या शिस्तबद्ध संचलनाने या स्पर्धेचे लक्ष वेधले.क्रीडा स्पर्धेची ज्योत पेटवून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कब्बडीचा पहिला सामना बीड विरूध्द अमरावती असा लावण्यात आला.
दरम्यान या क्रिडा स्पर्धा यशस्वीतेसाठी आत्मा मालिक धान पिठाचे व्यवस्थापक हिरामण कोल्हे, या संस्थेचे सर्व प्राचार्य ,विभाग प्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, एसटी महामंडळाचे विविध विभागाचे पदाधिकारी कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.