खेळजगत
खुल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत महर्षी विद्यालयाचे यश
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव(प्रतिनिधी)
कोपरगांव तालुक्यात भारतीय ट्राडिशनल शोतोकॉन कराटे असोशिअशन व कोपरगांव तालुका कराटे आसोशिअशन, यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यात संत जनार्दन स्वामी (मौं) महाराज विद्यालयातील खेळाडूंनी लक्षवेधी खेळ दाखवून विशेष यश संपादन केले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये रुतुजा कैलास शिरसागर – सुवर्ण पदक, नंदिनी अमोल टेके- रजत पदक, मुलांमधे कृष्णा शरद गायकवाड -सुवर्ण पदक , आर्यन सागर कोळपे- रजत पदक, साईश विलास गोंदकर -कांस्य पदक मिळवित यश संपादन केले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल विद्यालयाचे संस्थापक मोहनराव चव्हाण, विश्वस्त संदिप चव्हाण, प्राचार्य राजेंद्र पानसरे व पर्यवेक्षिका सौ. दरेकर व सर्व शिक्षकवृंदानी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. खेळाडूंच्या या यशाबद्दल त्याना विद्यालयाचे कराटे प्रशिक्षक योगेश बिडवे यांचे मार्गदर्शन लाभले होते.