खेळजगत
आत्मा मालिकमधील विद्यार्थ्यांच्या चित्राची राज्यपातळीसाठी निवड
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती निमित्त नुकत्याच जिल्हा स्तरीय बालचित्रकला स्पर्धा 2019 मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या होत्या त्यात कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मलिक शैक्षणिक संकुलाच्या विद्यार्थ्यांनी ‘गट’क्रं. 3 मध्ये, द्वितीय क्रमांक- सेजल ज्ञानेष्वर पर्वत, तृतीय क्रमांक-मुकेश जुगा पटले, चतुर्थ क्रमांक- सिध्देश सदाषिव कापसे, गट-4 था -प्रथम क्रमांक – सुरज सुर्यभान करंडे , द्वितीय क्रमांक- कुणाल बाबासाहेब हिरे , चतुर्थ क्रमांक-दिव्या मुकुंद भोये या विद्यार्थ्यांनी जिल्हा स्तरावर क्रमांक मिळवून लक्षवेधी यश संपादन केले असून त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना जिल्हा परिशद अध्यक्षा शालीनी विखे, उपाध्यक्षा राजश्री घुले, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, उपमुख्य कार्यकारी वासुदेव सोळंके , शिक्षणाधिकारी -दिलीप थोरे , उपजिल्हाधिकारी रामदास हरळ आदिंच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, रोक रक्कम देवून गौरविण्यात आले आहे.
वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आत्मा मालिक माऊली, परमानंद महाराज, सर्व संत मांदियाळी, आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, सरचिटणिस-हनुमंतराव भोंगळे , कोषाध्यक्ष-विठ्ठलराव होन, विश्वस्त-वसंतराव आव्हाड , प्रकाश भट, प्रकाश गिरमे, बाळासाहेब गोर्डे व सर्व विश्वस्त आश्रमाचे व्यवस्थापक-हिरामण कोल्हे, वतिगृह समन्वयक-पराग धुमाळ , गुरुकुलाचे प्राचार्य- निरंजन डांगे, माणिकराव जाधव, मिनाक्षी काकडे, सुधाकर मलिक , उपप्राचार्य रमेश कालेकर, नितीन सोनवणे, विभाग प्रमुख भारती तांबे , तसेच सर्व विभाग प्रमुख शिक्षक विद्यार्थी पालक व शिक्षिकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
सदर विद्यार्थ्यांना गुरुकुलाचे कला शिक्षक – ज्ञानेश्वर पर्वत, मंगेश रहाणे, अविनाश चौधरी, निलेष सावंत, गंगाधर जाधव, स्वप्निल पाटील, सिध्दोधन ससाणे, संदिप धनवटे , थोरात दत्तात्रय, गोकुळ गायकवाड,भारती भिंगारे, सोनाली ठाकुर यांचे मार्गदर्शन लाभले होते.