जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

श्रीरामपुरात विवाहितेचा छळ,पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

श्रीरामपूर (प्रतिनिधी )

बंगला घेण्यासाठी माहेरहून ३ लाख रुपये आणावेत, तुला मुलगी झाली आम्हाला मुलगा पाहिजे होता या कारणावरुन विवाहिता सासरी नांदत असताना तिचा वेळोवेळी शारिरीक व मानसिक छळ केल्याची घटना घडली असून. तिचा पती अझर शब्दर पठाण याने,”तलाक”, “तलाक”,” तलाक” असे तीन वेळा म्हणून बेकारदेशीरित्या तलाक देवून नांदवण्यास नकार दिला आहे. याप्रकरणी पतीसह पाच जणांविरुध्द श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे.
याबाबत सबिया अझर पठाण (वय २८, रा. श्रीरामपूर, हल्ली रा. अशोकनगर फाटा, निपाणी वडगाव, ता.श्रीरामपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी पती अझर शब्दर पठाण, सासरे शब्दर हमजेखॉ पठाण, सासु चाँद शब्दर पठाण, भाऊ आझाद शब्दर पठाण, जावं- मिनाज आझाद पठाण (सर्व रा. आर्दशनगर, वॉर्ड नं. १श्रीरामपूर) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

.फिर्यादी सबिया पठाण ही सासरी नांदत असताना वरील आरोपींनी तिने माहेरुन श्रीरामपूर रेथे स्वप्ननगरी रेथे रो हाऊस बंगला घेण्यासाठी ३ लाख रुपये आणावेत व तुला मुलगी झाली आम्हाला मुलगा पाहिजे होता. या कारणावरुन वारंवार तिचा वेळोवेळी शारिरीक व मानसिक छळ केला. तर तिचे पती अझर पठाण याने बेकारदेशीररित्या तलाक देऊन नांदवण्यास नकार दिला. त्यामुळे या छळास कंटाळून विवाहितेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पुढील तपास पोहेकॉ एस.एम. हापसे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close