खेळजगत
संत जनार्दन स्वामी महर्षी खेळांडुची राष्ट्रीय सुर्य नमस्कार स्पर्धेसाठी निवड
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव ( प्रतिनिधी )
नाशिक येथे नुकत्याच आठव्या ज्युनिअर राज्यस्तरीय सुर्य नमस्कार स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या असून या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्हयातील खेळाडुंनी सहभाग घेतला होता. यात कोपरगाव येथील संत जनार्दन स्वामी महर्षी स्कुलच्या खेळाडुंनी सहभाग घेतला होता त्यांनी या स्पर्धेत सोजल संजय लोहरकर हिने रजत तर तृप्ती विलास माळी हिने कांस्य पदक मिळविले आहे. या दोन्ही खेळांडुची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशस्वी खेळाडुंची विदयालयाचे संस्थापक अध्यक्ष मोहनराव चव्हाण, सर्व विश्वस्त, प्राचार्य राजेंद्र पानसरे, पर्यवेक्षिका सौ. जे.के. दरेकर, व सर्व शिक्षक आदींनी अभिनंदन केले आहे. या खेळाडुंना क्रीडा विभागप्रमुख शिवप्रसाद घोडके व गणेश वाकचौरे यांचे मार्गदर्शन लाभले होते.