जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव नगरपरिषदेला लागले आता हागणदारीचे तिहेरी मानांकनाचे वेध !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव ( प्रतिनिधी )

कोपरगाव नगरपरिषदेने गत तीन वर्षात शहर हागणदारी मुक्त करण्यासाठी केलेल्या मेहनतीला नुकतेच फळ प्राप्त झाले असून या मोहिमेचे चीज होत पालिकेला तपासणी पथकाने केलेल्या शिफारशीप्रमाणे ओ. डी. एफ.चे दुहेरी पदमानांकन प्राप्त झाल्याने नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे ,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन होत असून कोपरगाव पालिकेला आता तिहेरी मानांकनाचे वेध लागले आहे.


देशातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे या करिता या शहरांना स्वच्छतेची आणि या शहरामधील सर्व नागरीकांना शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देवून हे ध्येय गाठण्यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशामध्ये राबविण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार, हे अभियान 2 ऑक्टोंबर, 2014 पासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जन्मदिनापर्यंत म्हणजे 2 ऑक्टोंबर 2019 पर्यंत कोपरगावसह संपूर्ण देशात राबविण्यात आले होते.

राज्यात 26 महानगरपालिका व 239 नगरपरिषदा अशा एकूण 265 नागरी ‍ स्थानिक स्वराज्य संस्था असून, सन 2011 च्या जनगणनेनुसार राज्याची नागरी लोकसंख्या 5,08,27,531(राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 45.23 टक्के) एवढी आहे. तर, नागरी भागातील एकूण कुटुंबांची संख्या 1,08,13,928 एवढी आहे. त्यापैकी साधारण 29 टक्के कुटुंबांना शौचालयाची सुविधा उपलब्ध नाही. शौचालयाची सुविधा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांपैकी साधारण 73 टक्के कुटुंबे सार्वजनिक शौचालयांचा वापर करीत आहेत. तर, साधारण 27 टक्के कुटुंबे उघडयावर शौचालयास जात असल्याचे वास्तव आहे.

कोपरगाव नगरपरिषदेने अधिकारी सर्वच अधिकारी व आरोग्य विभागासह सर्वच कर्मचाऱ्यांनी गेल्या 3 वर्षांपासून केलेल्या परिश्रमाला यश मिळाले असून हागणदारी मुक्तीत कोपरगाव नगरपरिषदेला ओडीएफ प्लस प्लस मानांकन मिळाले आहे.शहरातील नागरीकांनी सहकार्य केले आहे.पण नागरिकांनी अजून मनापासून सहकार्य केले तर स्वच्छ सर्वेक्षण 2020 कोपरगावला “थ्री स्टार रेटिंग” मिळू शकते असा विश्वास नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी व्यक्त केला आहे.

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी) च्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यामधील सर्व शहरांमधील उघडयावर शौचालयास जात असलेल्या कुटुंबांना शौचालयाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी व शहरांमधील घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत भियान (नागरी) च्या धर्तीवर राज्यामध्ये “स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी)” हे एक अभियान म्हणून राबविण्यात येत आहे. या अभियानाचा कालावधी 2 ऑक्टोबर, 2019 पर्यंत होता.त्याचे निकाल नूकतेच जाहीर झाले असून त्यात कोपरगाव शहराने बाजी मारली आहे.

तीन वर्षांपूर्वी कोपरगाव शहराच्या आरोग्याची अत्यंत दुरावस्था झाल्याचे नागरिकांना आठवत असेल. आज मात्र नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष, नगरसेवक,अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रामाणिक कामामुळे शहर स्वच्छ व सुंदर करण्याकडे वाटचाल सुरू केल्याचे दिसून येत आहे. तरी अजूनही या कामात वेगाने सुधारणा करण्यासाठी नगरपरिषदेस नागरिकांच्या सहकार्याची अजून अपेक्षा आहे.कोपरगाव शहर हे सर्वच नागरिकांचे असून शहर स्वच्छतेला सहकार्याची गरज आहे,सर्वांच्या आरोग्यासाठी नागरिकांनी जागरूक राहून आपल्या जबाबदाऱ्या पार पाडणे गरजेचे असल्याचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी म्हटले आहे.

कोपरगाव शहर स्वच्छतेच्या कामात वेगाने सुधारणा करण्यासाठी नगरपरिषदेस नागरिकांच्या सहकार्याची अजून अपेक्षा आहे,सर्वांच्या आरोग्यासाठी नागरिकांनी जागरूक राहून आपल्या जबाबदाऱ्या पार पाडणे गरजेचे वाटते.कोपरगाव नगरपरिषद आरोग्य विभाग व सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान म्हणून शहरात “सफाई कर्मचाऱ्याचा पुतळा” उभारण्याचाही मानस आहे.- नगराध्यक्ष विजय वहाडणे

कोपरगाव नगरपरिषद आरोग्य विभाग व सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान म्हणून शहरात “सफाई कर्मचाऱ्याचा पुतळा” उभारण्याचाही मानस आहे. सफाई कर्मचाऱ्यांमुळेच नागरिकांचे व शहराचे आरोग्य सुरक्षित-अबाधित राहते याचे भान सर्वांनीच ठेवणे महत्वाचे आहे नागरिकांचे सहकार्य लाभले तर पालिकेला पुढील यश नक्कीच मिळेल असे मानले जात आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close