खेळजगत
आत्मा मालिकचे संघ शालेय विभागीय थ्रो बॉल स्पर्धेत अजिंक्य
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
राज्याचा पुणे येथील क्रिडा व युवकसेवा संचलनालय, जिल्हा क्रिडा परिषद, जिल्हा क्रिडाअधिकारी कार्यालय व जिल्हा थ्रोबॉल असोसिएशन अहमदनगर आयोजित विभागीय थ्रोबॉल स्पर्धा नुकत्याच आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकमठाण येथे मोठ्या उत्साहात पार पडल्या असून या स्पर्धेत आत्मा मालिक माध्यमिक गुरूकूलाने 17 वर्षे वयोगट मुले व आत्मा मालिक ज्युनिअर कॉलेज 19 वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने अजिंक्यपद राखून राज्यस्तरीय स्पर्धेत प्रवेश केला आहे. त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आत्मा मालिक माध्यमिक गुरूकूलाच्या 14 वयोगटातील संघाने उपविजेतेपद मिळविले. राज्यस्तरीय स्पर्धा यवतमाळ येथे जिल्हा क्रीडा संकुल येथे पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी सोलापूर शहर व ग्रामीण, पुणे शहर व ग्रामीण, पिंपरी चिंचवड नगर शहर व ग्रामीण येथील 14, 17 व 19 वयोगटातील मुले व मुलींचे एकूण 42 संघ सहभागी झाले होते. तसेच निवडचाचणीसाठी 210 खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
तसेच 14 वर्षे वयोगटात राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आत्मा मालिक माध्यमिक गुरूकूलाचा 1 विद्यार्थी व आत्मा मालिक गुरूकूलाच्या 2 मुलींची राज्य निवड चाचणी स्पर्धेसाठी निवड झाली. विजेच्या सर्व खेळाडूंचे आत्मा मालिक माऊली, परमानंद महाराज, चंद्रानंद महाराज व संत मांदियाळी व विश्वस्त मंडळाने अभिनंदन केले आहे.
या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी थ्रोबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव जगनमोहन गौड (तेलंगणा) आश्रमाचे कोषाध्यक्ष विठ्ठल होन, विश्वस्त वसंत आव्हाड, प्रकाश गिरमे, प्राचार्य माणिक जाधव, सुधाकर मलिक, नामदेव डांगे, नितिन सोनवणे, पुणे विभागीय थ्रोबॉल असोसिएशनचे गणेश म्हस्के, राजेंद्र मागाडे, संतोष खेंडे आदि उपस्थित होते.
सदर स्पर्धा यशस्वीतेसाठी आत्मा मालिकचे क्रीडा प्रशिक्षक पद्मराज गायके, कमलाकर डोके, आण्णासाहेब गोपाळ, किशोर पवार, संतोश मेढे, आजिनाथ निचळ, बाळासाहेब कोतकर यांनी परीक्षम घेतले आहेत.