खेळजगत
समिक्षा गोंदकरची जिल्हा स्तरीय मैदानी (गोळाफेक) स्पर्धेसाठी निवड.
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय व तालुका क्रीडा समिती कोपरगाव यांच्या वतीने शालेय तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा संपन्न झाल्या असून यामध्ये कोपरगाव येथील संत जनार्दन स्वामी महाराज महर्षी स्कुलच्या समिक्षा अण्णासाहेब गोंदकर हिने 17 वर्षातील मुलींच्या गटात गोळाफेक स्पर्धेत तालुक्यात द्वितीय क्रमांक तर भालेफेक मध्ये तृतीय क्रमांक मिळविला आहे. तीची निवड अहमदनगर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी झाली आहे. तीच्या यशाबददल विद्यालयाचे अध्यक्ष मोहनराव चव्हाण सर्व विश्वस्त प्राचार्य राजेंद्र पानसरे, पर्यवेक्षिका जे.के.दरेकर, व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे. या यशस्वी खेळाडुला विद्यालयाचे क्रीडा शिक्षक शिवप्रसाद घोडके, अनुप गिरमे यांचे मार्गदर्शन लाभले होते.