कोपरगाव तालुका
तालुक्याच्या उदासीन आमदारामुळे तालुका भकास- आशुतोष काळे
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुका दुष्काळाच्या यादीतून वगळला गेला अनेक तालुक्यांना दुष्काळाच्या अनुदानाचा लाभ मिळाला. मात्र कोपरगावची जनता दुष्काळी अनुदानापासून वंचित राहिली. हजारो क्युसेसने जायकवाडीमध्ये पाणी वाहून गेले जायकवाडी धरण १०० टक्के भरले व गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकरी मात्र विकत पाणी घेत आहे. यासर्व गोष्टीला तालुक्याच्या आमदार कारणीभूत असून तालुक्याच्या आमदार उदासीन असल्यामुळे कोपरगाव तालुका भकास झाल्याची टीका कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यावर नाव न घेता नुकतीच एका कार्यक्रमात केली आहे.
कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी, पोहेगाव, रांजणगाव देशमुख, देर्डे चांदवड, देर्डे कोऱ्हाळे आदी ठिकाणी विविध विकास कामाचे भूमिपूजन व उदघाटन आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले. याप् पंप्रसंगीचायत समिती सभापती अनुसया होन, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन रोहमारे, सुनील शिंदे, काकासाहेब जावळे, जी.प. सदस्या सोनाली रोहमारे, सोनेवाडीचे सरपंच गंगाधर खोमणे, देर्डे कोऱ्हाळे सरपंच योगीराज देशमुख, देर्डे चांदवड सरपंच ज्योती बर्डे, सोनेवाडीचे सरपंच गंगाधर खोमणे, सोनेवाडीचे सरपंच गंगाधर खोमणे, रांजणगाव देशमुख सरपंच संदीप रणधीर तसेच ग्रामस्थ व सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्या वेळी पुढे बोलताना म्हणाले की, मागील पाच वर्षापासून गोदावरी कालव्याच्या आवर्तनाचा बट्टयाबोळ झाला आहे. २०१४ पर्यंत तालुक्यात होणारी कालवा सल्लागार समितीची बैठक मुंबईला होत आहे. या बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही. सांगितलेले आवर्तन दिले जात नाही. शेतीसाठी अडीच किलोमीटरपर्यंतच पाणी देण्याचा निकष नसतांनादेखील अडीच किलोमीटर पर्यंतच तर काही ठिकाणी अडीच किलोमीटरच्या आतच शेतीसाठी पाणी देण्यात आले. त्याबाबत तालुक्याच्या आमदारांनी चकार शब्द काढला नाही. अशा अकार्यक्षम आमदारांना तालुक्याची जनता कंटाळलेली आहे. व तालुक्याच्या जनतेचा उत्साह पाहता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना घरी बसविल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त केला.