खेळजगत
कोपरगांव तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत आत्मा मालिकचे लक्षवेधी यश
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगाव तालुकास्तरीय शालेय खो-खो क्रीडा स्पर्धा नुकत्याच तालुका क्रीडा संकुल कोपरगांव या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडल्या असून या स्पर्धेत एकूण 100 संघ विविध वयोगटातील उपस्थित झाले होते.
यामध्ये आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलातील ओम गुरूदेव इंग्लिश मिडीयम गुरूकूलाच्या 14 वर्षे वयोगट मुले व मुली, 17 वर्षे वयोगट मुले व मुली, 19 वर्षे वयोगट मुली या पाच संघांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे.19 वर्षे वयोगटात अंतीम सामना ओम गुरूदेव इंग्लिश मिडीयम गुरूकूल विरूद्ध संजीवनी अकॅडमी यांच्यात पार पडला. अतिशय चुरशीच्या सामन्यात फक्त 1 गुणने विरूद्ध संघ विजयी झाला. व 19 वर्षे वयोगटात द्वितीय क्रमांक मिळविला आहे.
जिल्हास्तरीय शोलय खो-खो स्पर्धा दिनांक 11 ते 13 सप्टेंबर दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल वाडीया पार्क, अहमदनगर येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी आत्मा मालिकचे 5 संघ सहभागी होणार आहे.
या सर्व खेळाडूंना क्रीडाप्रशिक्षक गणेश म्हस्के, आण्णसाहेब गोपाळ, रविंद्र नेंद्रे, राजेंद्र ससाणे, रूपाली आहेर यांचे मार्गदर्शन लाभले.
खेळाडूंच्या या यशाबद्दल त्यांचे आत्मा मालिक माउली, परमानंद महाराज, निजानंद महाराज, सर्व संत माता, आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त, प्रकाश भट, वसंतराव आव्हाड, प्रकाश गिरमे, प्रभाकर जमधडे, बाळासाहेब गोर्डे, प्रकाश गिरमे, व्यवस्थापक हिरामण कोल्हे, प्राचार्य माणिक जाधव, विभाग प्रमुख नितीन सोनवणे तसेच सर्व विभागाचे प्राचार्य क्रीडाविभाग प्रमुख अशोक कांगणे, अजित पवार आदिंनी अभिनंदन केले आहे.