जाहिरात-9423439946
निवड

कुक्कुटपालन संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील गौतम सहकारी कुक्कुटपालन व्यावसायिक संस्थेच्या अध्यक्षपदी विजय कुलकर्णी व उपाध्यक्षपदी प्रभाकर शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

यावेळी अध्यक्षपदाच्या नावाची सूचना प्रकाश गवळी यांनी मांडली त्या सूचनेस प्रभाकर शिंदे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदाच्या नावाची सूचना विक्रम बाचकर यांनी मांडली त्या सूचनेस सुशील बोरावके यांनी अनुमोदन दिले.

गौतम सहकारी कुक्कुटपालन व्यावसायिक संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच ९ नोव्हेंबर रोजी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली आहे. या निवडणुकीत आ.आशुतोष काळे यांच्यासह भाऊसाहेब गोपाळराव भवर,प्रकाश माधवराव गवळी,चंद्रभान घमाजी घाटे,सुभाष रंभाजी कदम,विजयराव वसंतराव कुलकर्णी,प्रभाकर खंडेराव शिंदे,सुशील हरिभाऊ बोरावके, विक्रम म्हाळू बाचकर,माधव कचरू मेहेरखांब, सुमन देवचंद कडेकर,अलकाबाई रतनराव कदम हे सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.

या संस्थेच्या अध्यक्ष,उपाध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच निवडणूक अधिकारी एस.जी.मरकड यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी अध्यक्षपदाच्या नावाची सूचना प्रकाश गवळी यांनी मांडली त्या सूचनेस प्रभाकर शिंदे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदाच्या नावाची सूचना विक्रम बाचकर यांनी मांडली त्या सूचनेस सुशील बोरावके यांनी अनुमोदन दिले. यावेळी सर्व सदस्यांच्या अनुमतीने अध्यक्षपदी विजय कुलकर्णी व उपाध्यक्षपदी प्रभाकर शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याचे निवडणूक अधिकारी निवडणूक अधिकारी एस.जी.मरकड यांनी जाहीर केले.निवडणुककामी कुक्कुटपालनचे व्यवस्थापक सुरेश पेटकर यांनी सहकार्य केले.

यावेळी आपल्या निवडीबद्दल अध्यक्ष विजय कुलकर्णी व उपाध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कुक्कुटपालन संस्थेचे हित साधून सर्व संचालकांच्या मदतीने संस्थेला प्रगतीपथावर घेवून जाणार असल्याचे सांगितले.यावेळी सर्व संचालक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close