जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सामाजिक उपक्रम

समताचा “सुपर वुमन महिला पुरस्कार” जाहीर

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

समता पतसंस्था व समता इंटरनॅशनल स्कूल आयोजित ‘कौन बनेगी समता सुपर वुमन २०२१-२२’ स्पर्धा समता इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात शासनाचे कोरोना विषयी सर्व नियमांचे पालन करत उत्साहात पार पडली आहे.या स्पर्धेत सारिका कैलास भुतडा यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

महिला दिनानिमित्त काही देशांमध्ये महिला कर्मचाऱ्यांना सुटी देण्यात येते.तर काही देशांमध्ये ऑफिसेसमध्ये महिला कर्मचाऱ्यांसाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.महिलांनी मिळवलेल्या यशाचा,कामगिरीचा आढावा घेत त्यांचे अभिनंदन आणि कौतुकही या निमित्ताने करण्यात येते समता पतसंस्थेच्या वतीने या निमित्ताने,” कौंन बनेगी समता सुपर वुमन”या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्याचे पुरस्कार नुकतेच समताचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,माजी नगराध्यक्ष सुहासिनी कोयटे द्वयीच्या हस्ते प्रदान करण्यात आले आहे.

महिला दिनानिमित्त काही देशांमध्ये महिला कर्मचाऱ्यांना सुटी देण्यात येते.तर काही देशांमध्ये ऑफिसेसमध्ये महिला कर्मचाऱ्यांसाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.महिलांनी मिळवलेल्या यशाचा,कामगिरीचा आढावा घेत त्यांचे अभिनंदन आणि कौतुकही या निमित्ताने करण्यात येते समता पतसंस्थेच्या वतीने या निमित्ताने,” कौंन बनेगी समता सुपर वुमन”या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.त्यासाठी कोपरगाव,वैजापूर,येवला,राहाता, शिर्डी,श्रीरामपूर तालुक्यातील वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.

सदर प्रसंगी समता नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,संचालक संदीप कोयटे,गुलशन होडे,यांची प्रमुख उपस्थिती होती.

या स्पर्धेत सारिका कैलास भुतडा यांनी प्रथम,डॉ.मधुरा निहार जोशी यांनी द्वितीय तर डॉ.अपर्णा अतिश काळे यांनी तृतीय क्रमांक,रश्मी ऋषिकेश भडकवाडे यांनी चौथा,निशा सचिन गवारे यांनी पाचवा, तर अश्विनी जितेंद्र लिप्टे यांनी सहावा क्रमांक मिळवत बक्षिसे व सहभाग प्रमाणपत्रे प्रमुख उपस्थितांच्या हस्ते देण्यात आली आहेत. या स्पर्धेत पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.फेसबुक द्वारे लाईव्ह स्पर्धा दाखविण्यात आली होती परिसरातील हजारो नागरिकांना लाईव्ह प्रक्षेपनाद्वारे स्पर्धा पाहण्याची संधी प्राप्त झाली होती.

प्रसंगी शैलजा रोहम,अनिता जपे,खुशबू बंब (सी.ए),किरण भन्साळी,डॉ.पूजा कातकडे,प्रीती सत्यजीत कदम,डॉ.प्रियांका कोठारी,समीना अंजुम शेख,कल्पना सतीश अजमेरा,किरण दगडे,कोमल न्याती आदि महिलांनी सामाजिक,शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल समता स्कुलच्या विश्वस्त स्वाती कोयटे,शालेय पोषण आहार समितीच्या अध्यक्षा सुहासिनी कोयटे,श्वेता अजमेरा जोत्स्ना पटेल,प्रीती शहा,रोहिणी शिरोडे,वंदना होडे यांच्या हस्ते यथोचित सत्कार करून सन्मान करण्यात आला आहे.

कार्यक्रमाचे प्रास्तविक लिसा बर्धन यांनी केले तर उपस्थितांना सत्कारमूर्ती शैलजा रोहोम,विभावरी नगरकर,यांनी मार्गदर्शन केले आहे.स्पर्धेचे गुणांकन करण्याचे महत्वाचे काम लिसा बर्धन,विलास भागडे,समीर अत्तार यांनी केले तर स्पर्धेचे सुत्रसंचलन कु.सानिका निर्मल यांनी केले.स्पर्धा यशस्वितेसाठी समता इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी,नागरिकांचा प्रत्यक्ष आणि प्रसार माध्यमांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close