कोपरगाव तालुका
गुरुवर्य तुकाराम बाबा विद्यालयात “महिला दिन” साजरा
जनशक्ती न्यूजसेवा
कुभांरी-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायत हद्दीतील सार्वजनिक वाचनालय व गुरुवर्य तुकारामबाबा विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने नुकताच “जागतिक महिला दिन” उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
महिला दिनानिमित्त काही देशांमध्ये महिला कर्मचाऱ्यांना सुटी देण्यात येते.तर काही देशांमध्ये ऑफिसेसमध्ये महिला कर्मचाऱ्यांसाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.महिलांनी मिळवलेल्या यशाचा,अतुलनिय कामगिरीचा आढावा घेत त्यांचे अभिनंदन आणि कौतुकही या निमित्ताने करण्यात येते.कुंभारीत हा दिन मोठ्या उत्साहात करण्यात आला आहे.
महिला दिनानिमित्त काही देशांमध्ये महिला कर्मचाऱ्यांना सुटी देण्यात येते.तर काही देशांमध्ये ऑफिसेसमध्ये महिला कर्मचाऱ्यांसाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.महिलांनी मिळवलेल्या यशाचा,अतुलनिय कामगिरीचा आढावा घेत त्यांचे अभिनंदन आणि कौतुकही या निमित्ताने करण्यात येते. महिलांना प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळवून देण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने काही मार्गदर्शक तत्त्वे,कार्यक्रम निश्चित केले आहेत.ऑगस्ट १९१० मध्ये आंतरराष्ट्रीय महिला परिषदेचे कोपनहेगन येथे आयोजन करण्यात आले होते.याच परिषदेत जगभरात एक दिवस,”जागतिक महिला दिन” साजरा केला जायला हवा असे ठरविण्यात आले होते.पण तो दिवस त्यावेळी निश्चित करण्यात आला नव्हता.त्यानंतर १९१४ मध्ये पहिल्यांदा ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.त्यादिवशी रविवार असल्यामुळे हा दिवस निवडण्यात आला होता.पण त्यानंतर ८ मार्च रोजी जगभरात महिला दिन साजरा करण्याचा प्रघात पडला आहे.या निमित्त कुंभारी येथेही महिलांसाठी सामाजिक उपक्रम साजरा करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी विदयालयाचे मुख्याध्यापक जी.एम.ठाणगे उपस्थित होते.तसेच सरपंच प्रशांत घुले,बिबवे साहेब,रमण गायकवाड व असंख्य महिला उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून सायखेडा येथील प्रसिध्द डॉ.रोहिणी घुगे या होत्या.या वेळी त्यांनी महिला दिन व महिलांचे सामर्थ्य व स्वतःचा जीवनपट सविस्तरपणे मांडला आहे. महिलांनी कोणत्याही कामात नेहमीच अग्रेसर राहावे व आपले प्रयत्न करत राहावे या मुळे यश नक्कीच मिळतेच असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.
सदर प्रसंगी सोनारी,कोळगाव,देर्डेचांदवड या गावातील महिला सरपंचाचा सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एस.के.शिंदे यांनी केले.