सामाजिक उपक्रम
…या संस्थांचा शहरात कौतुकास्पद उपक्रम !

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील समता नागरी सहकारी पतसंस्था,समता चॅरिटेबल ट्रस्ट,कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ,कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन,समता इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात विविध ठिकाणी उन्हाळ्यातील तूषार्थांची तहान भागविण्यासाठी थंड पाण्याचे वॉटर कुलर बसविण्यात आले असून त्याचे उद्घाटन माजी नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे यांच्या हस्ते संपन्न झाले आहे.

दरम्यान कोपरगाव शहरात शासकीय कामासाठी बाहेर गावाहून येणाऱ्या नागरिकांना वॉटर फिल्टर व थंड पिण्याचे पाणी मिळत असल्यामुळे त्यांनी समता पतसंस्था व्यापारी महासंघासह विविध संस्थांचे कौतुक केले आहे.
समता सहकारी पतसंस्थेच्या वतीने कोपरगाव शहर आणि परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असतात.त्यात शहराचे सुशोभीकरण असो की,राज्य परिवहन मंडळाचे बस आगार असो की ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र असो की कोरोना काळात निराधारांना मोफत जेवणाचे काम असो असे नानाविध कार्यक्रम सातत्याने सुरू असतात.अशातच वर्तमानात उन्हाळा असल्याचे उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर म्हणजेच ४२ अंशाच्या पुढे वाढली आहे.जीवाची काहीली होत आहे.सर्व जीव मात्र पाणी- पाणी करत आहे.अशा नेमक्या वेळी समता सहकारी पतसंस्था आणि त्यांच्या सहकारी संस्था व्यापारी महासंघ आदींनी राज्य सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांच्या नेतृत्वाखाली पुढाकार घेत तालुक्यातील आपली महसुली व तत्सम कामे करण्यास कोपरगाव शहरात येणाऱ्या नागरिकांची तहान भागविण्यासाठी वॉटर कुलर ची व्यवस्था केली आहे.गेल्या ८ वर्षापासून समता आणि इतर संस्थांचा हा उपक्रम सुरू असून तालुक्यातील सुत्य उपक्रम समजला जात आहे.

कोपरगाव आगारात शहरातील प्रसिद्ध व्यापारी व समता पतसंस्थेचे संचालक स्व.गुलाबचंद खेमचंद अग्रवाल यांच्या स्मरणार्थ जलमंदिराचे उद्घाटन कोपरगाव तहसीलच्या नायब तहसीलदार प्रफुल्लता सातपुते व कोपरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे.या पाणपोईमुळे या बस स्थानकात आलेल्या प्रवाशांना जागेवर पाणी देण्याची सुविधा देखील करण्यात आलेली आहे.जागेवर पाणी नेऊन दिल्यामुळे प्रवाशांना जागा जाण्याची भीती नसतेच तसेच त्यांचे सोबत असलेले साहित्य देखील इतरत्र हलू शकत नाही.उन्हाच्या झळांपासून संरक्षण होते.स्वतः जवळ असलेल्या वस्तू चोरीला जाऊ शकत नाही.प्रत्येक उन्हाळ्यात हजाराच्या वर या पाणपोईचा लाभ प्रवासी घेत असतात.

कोपरगाव तहसीलमध्ये देखील तहसीलदार महेश सावंत व कोपरगाव नगरपालिका माजी नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे यांच्या शुभहस्ते समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने तहसील कार्यालयाला वॉटर कुलर,आरो मशीन उपलब्ध करून देत येथे पाणपोई सुरू करण्यात आली आहे.शासकीय कामासाठी बाहेर गावाहून माणसांना वॉटर फिल्टर व थंड पिण्याचे पाणी मिळत असल्यामुळे ते सुखद क्षण अनुभवत आहे.
दरम्यान याशिवाय कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन यांच्या वतीने आठवडे बाजाराला येणारे ग्राहक,छोटे-मोठे व्यापारी, किराणा दुकानदारांसाठी फिरती पाणपोई सुरू करून उन्हाळ्यात दर सोमवारी आठवडे बाजारात जलपान सेवा देण्यात येत आहे.
आठवडे बाजारातील पाणपोई उद्घाटन प्रसंगी कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन अध्यक्ष राजकुमार बंब,व्यापारी महासंघ कार्याध्यक्ष सुधीर डागा,संचालक महावीर सोनी,आशुतोष पटवर्धन,नरेश जोशी,हर्षल जोशी तर तहसील कार्यालयातील उद्घाटन प्रसंगी नायब तहसीलदार प्रफुल्लता सातपुते,जोत्स्ना अरविंद पटेल,जेष्ठ नागरिक मित्र मंडळ अध्यक्ष पुष्पलता सुतार,तहसील कार्यालयातील अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच कोपरगाव बस स्थानक येथील पाणपोई उद्घाटन प्रसंगी प्रसिद्ध व्यापारी दिपक अग्रवाल,चित्रा चांगदेव शिरोडे,गुलाबचंद अग्रवाल यांच्या स्नुषा शिल्पा अग्रवाल,मोनिका अग्रवाल,आगार लेखाकार एस.आर.गवळी,वाहतूक निरीक्षक अविनाश गायकवाड,नवनियुक्त वाहतूक निरीक्षक अमित हंपे,वाहतूक नियंत्रक संजीव गाडे,विशाल गुंजाळ,गौतम खरात,अनिता वाघ,उज्वला सोनवणे,प्रतिभा चव्हाण,लता देठे,आशिष कांबळे,विनोद रोहोम,रामहरी गव्हाणे,एच.आर.दराने आदींची उपस्थिती होती.या उपक्रमाचे सर्वात कौतुक होत आहे.