जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

….या संस्थेला राज्यस्तरीय विज्ञान जथ्था पुरस्कार

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ आयोजित डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विदयालयास दिला जाणारा राज्यस्तरीय ‘विज्ञान जथ्था’ पुरस्काराने आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयम गुरुकुलला सन्मानित करण्यात आले आहे त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

“आत्मा मालिक पॅटर्नचे हे यश असून याअंतर्गत अभ्यासक्रमाचे सुक्ष्म नियोजन,तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर,तयारी शिबीराचे आयोजन,नैदानिक चाचण्या,सराव परीक्षा,तज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थी व शिक्षकांचे परीश्रम यामुळे हे यश साकारले आहे”- नंदकुमार सुर्यवंशी,अध्यक्ष,जंगली महाराज आश्रम ट्रस्ट,कोकमठाण,कोपरगाव.

  आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयम गुरुकुल सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये राज्यात प्रथम स्थानावर आहे.डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेमध्ये गुरुकुलाचे २४ विदयार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड झाली.त्यामध्ये आदिती हुले सुवर्णपदकासह राज्यात प्रथम,अरविंद राठोड रौप्य पदकासह राज्यात द्वितीय तर ऋतुराज कारंडेने कास्य पदकासह राज्यात तृतीय क्रमांक मिळविला आहे.मुंबईतील यवंतराव नाट्यमंदिरामध्ये जेष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांच्या हस्ते सेमी इंग्लिश मिडीयम गुरुकुलास विज्ञान जथ्था पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी दिपक घैसास,डॉ.विनया जंगले,अच्युतराव माने,आत्मा मालिकचे प्राचार्य निरंजन डांगे,विभागप्रमुख सचिन डांगे,पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

  आत्मा मालिक पॅटर्नचे हे यश असल्याचे मानले जात आहे.याअंतर्गत अभ्यासक्रमाचे सुक्ष्म नियोजन,तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर,तयारी शिबीराचे आयोजन,नैदानिक चाचण्या, सराव परीक्षा,तज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थी व शिक्षकांचे परीश्रम यामुळे हे यश साकारले असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी केले आहे.

  दरम्यान या विदयार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे विभाग प्रमुख सचिन डांगे,पयवेक्षक गणेश रासने,अथर्व फाऊंडेशनचे शिवम तिवारी,शिक्षक अनुशिखा आस्ताना,प्रियांशू कुमार,आकृती मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले होते.

यशस्वी विद्यार्थ्यांचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवशी,उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे,सरचिटणीस हनुमंतराव भोगळे,कोषाध्यक्ष विठठल होन,विश्वस्त प्रकाश गिरमे,प्रदिपकुमार भंडारी, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे आदींनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close