धार्मिक
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे शिर्डीत दर्शन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शिर्डीत येऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.यावेळी खा.सुजय विखे,जिल्हाधिकारी तथा तदर्थ समिती सदस्य सिद्धाराम सालीमठ,संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर व उप मुख्य कार्यकरी अधिकारी राहुल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा श्री साईबाबा संस्थानचे वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर यांनी सत्कार केला,यावेळी खा.सुजय विखे,जिल्हाधिकारी तथा तदर्थ समिती सदस्य सिद्धाराम सालीमठ व संस्थानचे उप मुख्य कार्यकरी अधिकारी राहुल जाधव उपस्थित होते