धार्मिक
श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याला उत्साहात प्रारंभ

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था व नाट्य रसिक संच,शिर्डी आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक २९ जुलै ते शनिवार दिनांक ०६ ऑगस्ट याकालावधीत चालणा-या श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याला नुकतीच मंगलमय वातावरणात सुरुवात झाली असून या पारायण सोहळ्यात सुमारे ०३ हजार ५०० महिला व ०२ हजार पुरुष असे सुमारे ०५ हजार ५०० पारायणार्थींनी सहभाग घेतला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
रात्रौ ०७.३० ते ०९.३० यावेळेत आदर्श माध्यमिक विद्यालय, शिर्डी यांचा सांस्कृतिक कार्यक्रम साईआश्रम शताब्दी मंडपात व रात्रौ ७.३० ते ०९.३० यावेळेत नृत्यात्मि डान्स स्टुडिओ,शिर्डी यांचा भरतनाटय कार्यक्रम हनुमान मंदिराच्या शेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्दी मंडपात संपन्न झाला आहे.
काल सकाळी श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाची समाधी मंदिरातून हनुमान मंदिर व व्दारकामाई मार्गे रथातुन श्री साईआश्रम (१ हजार रुम) येथील पारायण मंडपापर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणूकीत संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी पोथी,विश्वस्त डॉ.एकनाथ गोंदकर व विश्वस्त सुनिल शेळके यांनी श्रींची प्रतिमा,विश्वस्त सचिन कोते यांनी विणा व शोभाताई गोंदकर यांनी कलश घेवून सहभाग घेतला.
यावेळी विश्वस्त सर्वश्री अॅड.सुहास आहेर,अविनाश दंडवते,सचिन गुजर,जयवंतराव जाधव,महेंद्र शेळके,संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी,मंदिर प्रमुख रमेश चौधरी,नाटय रसिक संचाचे पदाधिकारी अशोक नागरे,गणपत गोंदकर,भास्करराव गोंदकर,प्रकाश गायके,अशोक जगताप,अशोक कोते,आप्पासाहेब कोते,अशोक गोंदकर,प्रल्हाद वाणी,भाऊसाहेब साबळे,रामदास बडदे,मंदिर पुजारी,संस्थानचे कर्मचारी,ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिरवणूक पारायण मंडपात आल्यानंतर संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत व मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ व कलश पूजन करुन श्री साईसच्चरित पारायण वाचनाचा शुभारंभ करण्यात आला.सकाळी ०८ ते ११.३० व दुपारी ०१ ते ०५ यावेळेत श्री साईसच्चरिताचे वाचन करण्यात आले.सायंकाळी ०५ ते ०६ यावेळेत पारायणार्थी महिलांचा हळदी-कुंकू समारंभ कार्यक्रम झाला. रात्रौ ०७.३० ते ०९.३० यावेळेत आदर्श माध्यमिक विद्यालय, शिर्डी यांचा सांस्कृतिक कार्यक्रम साईआश्रम शताब्दी मंडपात व रात्रौ ७.३० ते ०९.३० यावेळेत नृत्यात्मि डान्स स्टुडिओ,शिर्डी यांचा भरतनाटय कार्यक्रम हनुमान मंदिराच्या शेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्दी मंडपात संपन्न झाला आहे.