धार्मिक
ईश्वर चिंतनाने मानवी मनाची शुद्धी होते-दत्तगिरीजी महाराज
न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)
भाविकांनी नुसतीच मंदिरे बांधण्यापेक्षा असलेल्या मंदिरात नित्य पूजा विधी व ईश्वर चिंतन केले तर वातावरणात व मानवी मनात शुद्धी येऊन परमेश्वर माणसाला सद्बुद्धी देतो असे प्रतिपादन संत जनार्दन स्वामी महाराज यांचे शिष्य श्री दत्तगिरी महाराज यांनी कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
कोपरगाव तालुक्याच्या पूर्वेस साधारण सात कि. मी.अंतरावर असलेल्या संवत्सर ग्रामपंचायत हद्दीतील श्री क्षेत्र लक्ष्मणवाडी येथे ग्रामस्थ व भाविकांच्या वतीने श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे त्यावेळी उपास्थित भाविकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
सदर प्रसंगी साध्वी शारदा गिरी महाराज,गोदावरी नामदेवराव परजणे तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे,काळे सहकारी कारखाण्याचे संचालक बाळासाहेब बारहाते,बाळासाहेब दहे,पत्रकार शिवाजी गायकवाड,कल्याणी भाकरे,सुनीता भाकरे,अश्विनी भाकरे,कारभारी भाकरे,संजय भाकरे,सोमनाथ निरगुडे,सुभाष लोखंडे,वकील संघाचे अध्यक्ष अड्.शिरिषकुमार लोहकणे,शिवाजीराव बरहाते,प्रसाद साबळे,दिलीप ढेपले,खंडू फ़ेफाळे,बाळासाहेब शेटे,ज्ञानेश्वर कासार,बंडोपंत आचारी,राजेंद्र भोकरे,बाळासाहेब रोहोम,सचिन दहे,महेश परजणे,केशव भाकरे,नितीन भाकरे,मारुती भोसले,अजित भाकरे किसन पवार,आदी मान्यवरांसह बहुसंख्येने भाविक भक्त उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,हनुमान ऊर्फ मारुती ही रामायणातील एक लोकप्रिय व्यक्तिरेखा असून तो श्री रामाचा महान भक्त, दास, दूत मानला जातो. त्याचा जन्म अंजनी या वानरीच्या पोटी अंजनेरी येथे झाला होता. हे गाव व या नावाचा डोंगरी किल्ला महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यात आहे.मारुतीचे वडील केसरी. वीर मारुती हा अतिशय ताकदवान-महाबली होता. त्याला अनेक शक्ती सिद्धी प्राप्त होत्या. लहानपणी त्याला सूर्याला पकडण्याची इच्छा झाली. म्हणून त्याने सूर्याच्या दिशेने झेप घेतली. ते बघून इंद्रासहित सर्व देवांना काळजी वाटू लागली. सूर्याला व पृथ्वीला वाचविण्यासाठी इंद्राने आपले वज्र हनुमानाच्या दिशेने फेकले.त्या प्रहाराने हनुमानाचे तोंड वाकडे झाले, व तो बेशुद्ध पडला. नंतर देवांनी त्यांना भीतीपायी ‘तुला आपल्या सर्व शक्तींचा विसर पडेल’ असा शाप दिला.मोगल राजवटीत पारतंत्र्यातून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी व तरुणांना आपल्या सामर्थ्याची जाणीव करून देण्यासाठी प्रेरणास्थान म्हणून रामदास स्वामींनी गावोगाव वीर हनुमानाच्या मंदिरांची स्थापना करण्यास प्रोत्साहन दिले होते.तो पासून गावागावात आजही मध्यवर्ती ठिकाणी हनुमान मंदिरे आजही विद्यमान दिसत आहेत.त्याला संवत्सर गावही अपवाद नाही.
कार्यक्रमाचे प्रास्तविक लक्ष्मणराव साबळे यांनी तर सुत्रसंचलन चंद्रभान कर्पे यांनी केले.ग्रामस्थांनी या ठिकाणी लोकवर्गणीतून वीर हनुमान यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे.त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.