जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

कोपरगाव तालुक्यात..या ठिकाणी हनुमान प्राणप्रतिष्ठा सोहळा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

संवत्सर-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्याच्या पूर्वेस साधारण सात कि. मी.अंतरावर असलेल्या संवत्सर ग्रामपंचायत हद्दीतील श्री क्षेत्र लक्ष्मणवाडी येथे शनिवार दि.२८ ऑगष्ट रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास ग्रामस्थ व भाविकांच्या वतीने श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार सोहळा आयोजित केला असून हा सोहळा दि.२६ ऑगष्ट पासून प्रारंभ होत असल्याची माहिती ग्रामस्थांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

मोगल राजवटीत पारतंत्र्यातून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी व तरुणांना आपल्या सामर्थ्याची जाणीव करून देण्यासाठी प्रेरणास्थान म्हणून रामदास स्वामींनी गावोगाव रामभक्त वीर हनुमानाच्या मंदिरांची स्थापना करण्यास प्रोत्साहन दिले होते.तो पासून गावागावात आजही मध्यवर्ती ठिकाणी हनुमान मंदिरे आजही विद्यमान आहेत.त्याला संवत्सर गावही अपवाद नाही.

हनुमान ऊर्फ मारुती ही रामायणातील एक लोकप्रिय व्यक्तिरेखा असून तो श्री रामाचा महान भक्त, दास, दूत मानला जातो. त्याचा जन्म अंजनी या वानरीच्या पोटी अंजनेरी येथे झाला होता. हे गाव व या नावाचा डोंगरी किल्ला महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यात आहे.मारुतीचे वडील केसरी. वीर मारुती हा अतिशय ताकदवान-महाबली होता. त्याला अनेक शक्ती सिद्धी प्राप्त होत्या. लहानपणी त्याला सूर्याला पकडण्याची इच्छा झाली. म्हणून त्याने सूर्याच्या दिशेने झेप घेतली. ते बघून इंद्रासहित सर्व देवांना काळजी वाटू लागली. सूर्याला व पृथ्वीला वाचविण्यासाठी इंद्राने आपले वज्र हनुमानाच्या दिशेने फेकले. त्या प्रहाराने हनुमानाचे तोंड वाकडे झाले, व तो बेशुद्ध पडला. नंतर देवांनी त्यांना भीतीपायी ‘तुला आपल्या सर्व शक्तींचा विसर पडेल’ असा शाप दिला.मोगल राजवटीत पारतंत्र्यातून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी व तरुणांना आपल्या सामर्थ्याची जाणीव करून देण्यासाठी प्रेरणास्थान म्हणून रामदास स्वामींनी गावोगाव वीर हनुमानाच्या मंदिरांची स्थापना करण्यास प्रोत्साहन दिले होते.तो पासून गावागावात आजही मध्यवर्ती ठिकाणी हनुमान मंदिरे आजही विद्यमान आहेत.त्याला संवत्सर गावही अपवाद नाही.

सदरच्या कार्यक्रमास संवत्सर व परिसरातील भाविक भक्तांनी बहु संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन लक्ष्मणवाडी येथील भजनी मंडळ यांनी केले आहे.ग्रामस्थांनी या ठिकाणी लोकवर्गणीतून वीर हनुमान यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे.त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close