जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अपघात

…या ठिकाणी ऊसास आग,मोठे नुकसान ?

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायत हद्दीतील प्रगतशील शेतकरी वासुदेव कारभारी देवकर यांचा गट नंबर 180 मध्ये आज दुपारी दोन वाजता विजेच्या पोल जवळ चालु गळीतास असलेल्या एक एकर ऊस क्षेत्रास मोठी आग लागून मोठे नुकसान झाले असल्याची बातमी हाती आली आहे.याला महावितरण कंपनीचे शॉर्ट सर्किट झाले असल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केला आहे.

गळीतास असलेल्या ऊसास लागलेली आग आणि झालेले नुकसान.

  

आज दुपारी दोन वाजता एक सुलतानी आपत्तीचा सामना कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील शेतकरी वासुदेव कारभारी देवकर यांना करावा लागला आहे.आज दुपारच्या सुमारास मोठ्या प्रमाणात उन्हाचा चटका जाणवत असताना शेजारी वस्ती असलेले शेतकरी निखिल देवकर यांना ऊस पिकातून मोठा धूर निघताना दिसला असता ही घटना उघडकीस आली होती.

   याबाबत सविस्तर वृत्त असे की,”वर्तमानात परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले असताना व त्याची नुकसान भरपाई अद्याप पदरात पडली नसताना आज दुपारी दोन वाजता एक सुलतानी आपत्तीचा सामना कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील शेतकरी वासुदेव कारभारी देवकर यांना करावा लागला आहे.आज दुपारच्या सुमारास मोठ्या प्रमाणात उन्हाचा चटका जाणवत असताना शेजारी वस्ती असलेले शेतकरी निखिल देवकर यांना ऊस पिकातून मोठा धूर निघताना दिसला असता त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.त्या ठिकाणी शेतकरी वासुदेव देवकर यांच्या गळीतास असलेल्या उसास मोठी आग लागलेली दिसून आली होती.त्यांनी तात्काळ दूरध्वनी करून ही बाब गजानन देवकर यांना कळवली होती.त्यांनी तात्काळ कारखाना अग्नीशामक बंबाना या घटनेची माहिती दिली होती.त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली आहे.त्यामुळे शेजारी गळीतास असलेल्या अनेक ऊस पिकांचे नुकसान टळले आहे.

आग विझवण्यासाठी मदत करणारे शेतकरी.

   दरम्यान ही आग नियंत्रणात आणण्यासाठी कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती सुनील देवकर,मच्छिंद्र देवकर,राजकिरण देवकर,भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष सतीश देवकर,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शशिकांत देवकर,उपसरपंच संजय देवकर,शाम भोकरे,प्रवीण मालकर,प्रसाद मालकर,अनिल बापूसाहेब देवकर,पांडुरंग देवकर,निखिल देवकर,गजानन देवकर,आप्पासाहेब देवकर,पिंटू देवकर,जगन्नाथ देवकर,साहिल देवकर आदींनी मोठे योगदान दिले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.घटनास्थळी संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे शेतकरी अधिकारी सुशांत आहेर,महावितरण कंपनीचे कर्मचारी निकम,हुळेकर आदींनी भेट देऊन पाहणी केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.या प्रकरणी महसूल व कृषी विभागाने तातडीने पाहणी करून पंचनामा करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close