धार्मिक
साई संस्थानला कोविड सुरक्षा साहित्याची देणगी
![](https://newsseva.in/wp-content/uploads/2020/11/IMG-20201126-WA0030-780x405.jpg)
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
ओडीसा राज्यातील भुवनेश्वर येथील श्री साई कृपा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सदाशिब दास यांनी ०१ लाख रुपये किंमतीचे कोवीड सुरक्षा साहित्य व अन्नदानाकरीता रोख रक्कम ०१ लाख रुपये असे एकुण ०२ लाख रुपयांची देणगी संस्थानला दिली असल्याची माहिती संस्थानने दिली आहे. सदरचे देणगी साहित्य हे संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांच्याकडे सुपुर्त केले आहे.
ओडीसा राज्यातील भुवनेश्वर येथील श्री साई कृपा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सदाशिब दास यांनी ०१ लाख रुपये किंमतीचे कोवीड सुरक्षा साहित्य संस्थानला देणगी स्वरुपात दिले असून यामध्ये ०५ हजार नग सर्जिकल मास्क,०८ हजार ५०० नग हॅण्डग्लोज,४०० नग फेस शिल्ड व १२५ लिटर सॅनिटायझर अशा साहित्यांचा समावेश आहे.
ओडीसा राज्यातील भुवनेश्वर येथील श्री साई कृपा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सदाशिब दास यांनी ०१ लाख रुपये किंमतीचे कोवीड सुरक्षा साहित्य संस्थानला देणगी स्वरुपात दिले असून यामध्ये ०५ हजार नग सर्जिकल मास्क, ०८ हजार ५०० नग हॅण्डग्लोज, ४०० नग फेस शिल्ड व १२५ लिटर सॅनिटायझर अशा साहित्यांचा समावेश आहे. तसेच अन्नदान फंड करीता रोख रक्कम ०१ लाख रुपये असे एकुण ०२ लाख रुपयांची देणगी संस्थानला दिली आहे.
संस्थानने या दानविराचे अभिनंदन केले आहे.