धार्मिक
वारकरी मंडळाच्या शहराध्यक्षपदी ह.भ.प.जाधव
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या कोपरगाव शहर सप्ताह व दिंडीच्या प्रमुखपदी भीमराज महाराज जाधव यांची निवड करण्यात आली आहे.हीं निवड तीन वर्षांसाठी करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ह.भ.प.अनिल महाराज वाळके आणि नगर जिल्हाध्यक्ष ह.भ.प.गणेश महाराज डोंगरे यांनी ही नियुक्ती केली आहे.अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या नियमावलीनुसार जाधव यांना वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार, दिंडी व अन्य कामे करायची आहेत.जाधव हे गेल्या तीन दशकांपासून महाराष्ट्रभर प्रवचन आणि कीर्तने करीत आहेत.त्यांनी कोपरगाव शहरात लक्ष्मीनगर भागात दक्षिणमुखी हनुमान मंदिराची उभारणी केली आहे.अनेक सामाजिक कामांत ते सहभागी असल्याचे समजते.