धार्मिक
श्रीक्षेत्र काशी येथून आलेल्या कावड यात्रेचेस्वागत

न्युजसेवा
संवत्सर- (शिवाजी गायकवाड)
राहाता तालुक्यातील डोऱ्हाळे येथील भाविकांनी केलेल्या वीस दिवसाच्या श्रीक्षेत्र काशी सायकल यात्रेचा कोपरगांव येथील श्री संत जनार्दन स्वामी आश्रमात शुक्रवारी मोठ्या उत्साहात समारोप झाला आहे.

श्री क्षेत्र काशी येथील गंगेचे पवित्र पाणी आणि तिथले धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व यामुळे काशीला विशेष स्थान आहे.असे मानले जाते की,गंगेच्या पाण्याने स्नान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्ती होते.त्यामुळे धार्मिक उत्सवात त्याचा अगत्याने वापर केला जातो.
काशी आणि गंगेचे नाते खूप जुने आहे.हे शहर प्राचीन संस्कृती आणि परंपरेचा भाग आहे.काशी क्षेत्रातील पाण्याचे महत्व खूप मोठे आहे.गंगेचे पवित्र पाणी आणि तिथले धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व यामुळे काशीला विशेष स्थान आहे.असे मानले जाते की,गंगेच्या पाण्याने स्नान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्ती होते.त्यामुळे धार्मिक उत्सवात त्याचा अगत्याने वापर केला जातो.राहाता तालुक्यात डोऱ्हाळे या ठिकाणी धार्मिक उत्सव सुरू असून त्यासाठी या परिसरातील तरुण १८ दिवस सायकल प्रवास करून थेट हे पाणी आणतात हे विशेष!
त्यांचे स्वागत नुकतेच संवत्सर येथे करण्यात आले आहे.

यावेळी आश्रमाचे प्रमुख पूज्य रमेशगिरी महाराज व गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी यात्रेकरूंचे स्वागत करुन सदिच्छा दिल्या आहेत.संवत्सर येथील कार्यकर्त लक्ष्मणराव बोरनारे व भरत बोरनारे यांच्यातर्फे यात्रेकरूंना व उपस्थित भाविकांना प्रसादरुपी अल्पोपहार देण्यात आला आहे.

डोऱ्हाळे येथील भाविकांनी काशी क्षेत्राचा वीस दिवसांचा प्रवास करुन श्री काशी विश्वेश्वराचे दर्शन घेऊन कावडीने काशीचे जल आणले.श्री संत जनार्दन स्वामी आश्रमात त्यांचे शुक्रवारी आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले.डोऱ्हाळे गावी नऊ दिवसापासून नवनाथ पारायण सोहळा सुरु आहे.या पारायण सोहळ्याच्या समारोप प्रसंगी हे भावीक उपस्थित राहणार आहेत.या नवनाथ पारायण सोहळ्याची सुरुवात स्व.शामराव लांडगे पाटील यांनी काशी यात्रेचे जल आणून नवनाथ पारायण सोहळ्यात जल पूजा करून गावातील सर्वधर्मीय लोकांना महाप्रसाद देऊन त्यांनी चांगली प्रथा सुरु केली.तीच प्रथा डोऱ्हाळे गावातील स्व.लांडगे पाटील यांचे बंधू व ग्रामस्थांनी सुरु ठेवलेली आहे.चांगलं कर्म केल्याने त्याचं फळ निश्चित चांगलं मिळतं असे उदगार परमपूज्य रमेशगिरी महाराज यांनी काढले तसेच गोदावरी खोरे नामदेवराव रजणे पाटील दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे यांनी डोऱ्हाळे गावच्या भाविकांनी काशी यात्रेची सायकलवर कावड आणण्याचं जे काम केलं आहे ते वाखाणण्याजोगे असून अतिशय चांगल धार्मिक काम त्यांनी केलेले असल्याचे सांगून श्री परजणे यांनी यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या.
कावड यात्रेसाठी मधुकरराव चौधरी,संजय लांडगे,रामराव सुपेकर,वाळुंज यांच्यासह कणकुरी,लोणी,कोकमठाण,वेस या ठिकाणाहून देखील सायकलवारीसाठी शिवभक्त भाविक गेलेले होते.संत जनार्दन स्वामी आश्रमात पार पडलेल्या यात्रेकरूंच्या स्वागत कार्यक्रमाच्यावेळी संवत्सरचे उपसरपंच विवेक परजणे,खंडू फेपाळे,सोमनाथ पाटील निरगुडे,दिलीप ढेपले,बाळासाहेब दहे. लक्ष्मणराव साबळे,बंडू नाना आचारी,चंदूमामा लोखंडे,पत्रकार शिवाजी गायकवाड, भाऊसाहेब कासार,रमेश निरगुडे,बाळासाहेब निरगुडे यांच्यासह संवत्सर व परिसरातील भावीक उपस्थित होते.कार्यकर्ते लक्ष्मणराव बोरनारे व भरतराव बोरनारे यांच्यातर्फे यात्रेकरूंना व उपस्थित भाविकांना अल्पोपहार देण्यात आला.या प्रसंगी दिलीपराव ठेपले यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे.