धार्मिक
…या शहरात हनुमान जयंती उत्साहात संपन्न

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराचे उपनगर असलेले टिळकनगर येथे जय बजरंग मित्र मंडळाच्या वतीने राम भक्त हनुमान यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली असून त्या निमित्ताने भाविकांना खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले आहे.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

रामभक्त हनुमान ऊर्फ मारुती ही रामायणातील एक लोकप्रिय व्यक्तिरेखा असून ते श्री रामांचे महान भक्त,दास,दूत मानले जातात.त्यांचा जन्म अंजनी या वानरीच्या पोटी अंजनेरी येथे झाला होता असे मानले जाते.हे गाव अंजनेरी नावाचा डोंगरी किल्ला महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यात आहे.
चैत्र पौर्णिमेला मारुतीचा जन्म झाला असे महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात अंजनेरी गडावर झाला असल्याचे मानले जाते,त्यामुळे त्यादिवशी त्या राज्यात हनुमान जयंती असते. हनुमानाचा जन्म नरक चतुर्दशीच्या दिवशी झाला असे उत्तर भारतात समजले जाते.या दिवशी महाराष्ट्रात आश्विन कृष्ण चतुर्दशी आणि उत्तर भारतात कार्तिक कृष्ण चतुर्दशी असते.रामभक्त हनुमान ऊर्फ मारुती ही रामायणातील एक लोकप्रिय व्यक्तिरेखा असून ते श्री रामांचे महान भक्त,दास,दूत मानले जातात.त्यांचा जन्म अंजनी या वानरीच्या पोटी अंजनेरी येथे झाला होता असे मानले जाते.हे गाव अंजनेरी नावाचा डोंगरी किल्ला महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यात आहे.मारुतीचे वडील केसरी.वीर मारुती हे अतिशय ताकदवान-महाबली होते.त्यांना अनेक शक्ती सिद्धी प्राप्त होत्या.त्यांनी राम-रावण युद्धात भगवान रामाच्या बाजूने लढल्याने भगवान रामांचा विजय सोपा गेला होता.वीर हनुमान यांनी रामसेतू बनवून श्रीलंका जाण्यास त्यामुळे मोठी मदत मिळाली होती.लक्ष्मण आणि मेघनाथ युद्धात लक्ष्मणास शक्ती लागल्याने या संकटाच्या वेळी वीर हनुमान यांनी मोठी मदत केली होती.त्यामुळे वीर हनुमान यांना भारतात पुज्यनिय मानले जाते.त्यांची आज जयंती असल्याने कोपरगाव शहरातील भाविकांनी विविध सामाजिक उपक्रमांनी ती मोठ्या उत्साहात संपन्न केली आहे.कोपरगाव शहरातील टिळकनगर येथील जय बजरंग मित्र मंडळाचा वतीने ती साजरी झाली असून त्या निमित उपस्थित भाविकांना खिचडी प्रसाद वाटप करण्यात आले आहे.
सदर प्रसंगी संजय खरोटे,संजय कद्दे,सुभाष पंडोरे,नीरज घंगारे,कैलास वीर,आनंद उगले,जितेंद्र टोरपे,गणेश माघाडे,सुनील बैरागी,विशाल शिंदे आदीसह अनेकांनी मोठे योगदान दिले आहे.त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.