जाहिरात-9423439946
धार्मिक

…या देवीच्या पादुका दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

आदिशक्ती सप्तश्रुंगी देवींच्या चरण स्पर्श झालेल्या पादुकांचे  कोपरगाव शहरात सोमवार दि.१६ रोजी साधू संतांच्या उपस्थितीत ढोल पथकांच्या निनादात आणि तुतारीच्या आवाजात भव्य दिव्य स्वरुपात आकर्षकरित्या सजविलेल्या पालखीतून काढण्यात आलेल्या मिरवणुकीच्या सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.यावेळी कोपरगाव शहरातील चौकाचौकात असंख्य भाविकांनी पालखीचे पूजन करून आदिशक्ती सप्तश्रुंगी देवीच्या चरण स्पर्श झालेल्या पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले आहे.

दरम्यान या मिरवणुकीत सहभागी झालेल्या आ.आशुतोष काळे यांनी प्राचीन शिवकला असलेली पारंपारिक वाद्य संबळ वाजवला.चैताली काळे व वारकऱ्यांसमवेत फुगडी खेळले असल्याचे दिसून आले आहे.

प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे व जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांच्या पुढाकारातून कोपरगाव मध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा केला जातो.यावर्षी कोपरगाव तालुक्यातील भाविकांना आदिशक्ती सप्तश्रुंगी देवींच्या चरण स्पर्श झालेल्या पादुकांचे दर्शन व्हावे यासाठी वणी गडावरील आदिशक्ती सप्तश्रुंगी देवींच्या चरण स्पर्श झालेल्या पादुका कोपरगावमध्ये आ.काळे यांनी आणल्या आहेत.या पादुकांचे सर्व भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी या पावन पादुका कोपरगाव शहरातील श्री तुळजाभवानी मंदिर,श्री लक्ष्मीआई माता मंदिर,मुंबादेवी मंदिर,श्री कालिकामाता मंदिर,श्री सप्तश्रृंगी मंदिर व श्री जगदंबा माता मंदिर या ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या,आदिशक्ती सप्तश्रुंगी देवींच्या चरण स्पर्श झालेल्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी कोपरगावकरांची मोठी गर्दी झाली होती.
  या पादुकांची सोमवार (दि.१६) रोजी सायंकाळी ४ वाजता आकर्षकरित्या सजविलेल्या पालखीतून श्री जब्रेश्वर मंदिरापासून कृष्णाई मंगल कार्यालयापर्यंत भव्य वाजत गाजत शोभायात्रा काढण्यात आली.

यावेळी आ. आशुतोष काळे व चैताली काळे यांनी पालखी खांद्यावर घेवून पालखी मार्गस्थ झाली.या पालखीचे चौका-चौकात महिला भगिनींनी पूजन करून पावन पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले.कोपरगाव शहरातील सर्व रस्त्यांवर भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

   मिरवणुकीत सहभागी झालेल्या लेझीम पथकाने तसेच मुलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून नागरिकांचे वेधून घेतले होते.मुलींनी आदिशक्तीची विविध रूपे साकारून भाविकांना मंत्रमुग्ध करून सप्तशृंगी मातेच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेल्यामुळे सर्वत्र भक्तीमय वातावरण तयार झाले होते.

  यावेळी प.पु.रमेशगिरी महाराज,परमानंदगिरी महाराज,विवेकानंदगिरी महाराज,जितेंद्रानंदगिरी महाराज, राजनानंदगिरी महाराज,प्रेमानंदगिरी महाराज,राजेश्वरगिरीजी महाराज,परमपूज्य शरदानंदगिरी महाराज,प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे, श्री सप्तशृंगी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त अॅड.दिपक पाटोदकर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close